ऐकावं ते नवलच! पतीने बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवल्यामुळे पत्नीने घेतला घटस्फोट; वाचा नेमकं काय घडलं…

नवरा – बायको हे नातंच असं खास आहे की, या नात्यात वादही होतात आणि मिटवलेही जातात. छोट्या – छोट्या कारणांवरून नवरा – बायकोच्या नात्यात खटके उडत असतात. मात्र कधी कधी ही भांडणे एवढी टोकाला जातात की, अनेक जण घटस्फोट घेण्याचा मोठा निर्णय घेतात.

कोणताही विचार न करता एवढ्या वर्षाचे आपले नाते एका क्षणात तोडून टाकतात. परंतु घटस्फोट घेण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत जी तुम्ही अनेकदा ऐकली आणि वाचली देखील असतील. मात्र घटस्फोटाचे असे एक अजब कारण समोर आले आहे की, ते कारण वाचून तुम्हालाही जबर धक्का बसेल.

नुकताच एका व्यक्तीने त्याच्या घटस्फोटाच्या कारणाचा खुलासा केला आहे. कोणत्याही वादामुळे या व्यक्तीचा घटस्फोट झालेला नसून एका वेगळ्याच कारणाने घटस्फोट झाल्याचा खुलासा या व्यक्तीने केला आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..? या आहे घटस्फोटाचे कारण?

सिंकमध्ये काही खरकटी भांडी तशीच ठेवल्याने या व्यक्तीचा घटस्फोट झाला आहे. कारण वाचून बसला ना तुम्हालाही धक्का, पण ही खरी घटना आहे. या छोट्याश्या कारणावरून या महिलेने 12 वर्षांच नात तोडलं आहे. याबाबत बोलताना या व्यक्तीने याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.

त्याने सांगितले की, त्याच्या ३४ व्या वाढदिवसादिवशी पत्नीने मोठा धक्का दिला. या व्यक्तीने हे सांगितलं की, घटस्फोटाचं हे कारण केवळ चुकीचंच नाही तर हास्यास्पद आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये त्याने त्याचं लग्न मोडण्याच्या कारणाचा खळबळजनक खुलासा केला.

या व्यक्तीने सांगितलं की, तो जास्तकरून सिंकजवळ पाण्याचे ग्लास ठेवत होता. कधी कधी प्लेट्सही ठेवत होता. त्यासोबतच तो कपडेही इकडे-तिकडे ठेवत होता आणि याच कारणावरून त्याचा घटस्फोट झाल्याचे त्याने सांगितले. याचबरोबर घटस्फोटानंतर पत्नीने याबाबत पतीला सांगितलं की, ती तिच्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या
युवा शेतकऱ्याची कमाल! पाणीटंचाईवर मात करीत फुलवली कलिंगडची शेती; कलिंगड थेट दुबई रवाना
यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये मातोश्रीचा उल्लेख सापडल्यानंतर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले..
‘आमचा एकच दणकट बसला की आईचं दुध आठवेल’, शिवसेना आमदाराचा काँग्रेस-राष्ट्रवादीला घरचा आहेर
आयपीएल सुरू होताच नवीन वादाला फुटले तोंड, ‘या’ संघावर बंदी घालण्याची चाहत्यांनी केली मागणी