अपघात(Accident)पुणे एक्सप्रेस हायवेवर रविवारी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. जागीच त्यांची जीवनज्योत मावळली. त्यांचा अपघात एका ट्रकने झाल्याचे समजले होते. ट्रक चालक फरार झालेला होता. त्या ट्रकचा तपास चालू होता. तो ट्रक पालघर मधील असल्याचे समजले आहे. ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विनायक मेटे यांच्या अपघातास कारणीभूत असेलेला ट्रक पालघर जिल्हातील कासा येथे असल्याची माहिती मिळाली होती. ट्रकचा नंबर DN09 P 9404 असून आयसर कंपनीचा असल्याचे समजले आहे. ट्रक चालकाचे नाव उमेश यादव आहे. हा ट्रक ताब्यात घेण्याकरिता पोलीस पालघर जिल्हातील वापी येथे रवाना झाले होते. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
या ट्रकचा तपास लागणे या अपघाताच्या मुळापर्यंत जाण्याकरिता एकमेव मार्ग होता. या आयसर ट्रकवरूनच अपघात की घातपात याबाबत खुलासा होऊ शकतो. ट्रकचा शोध घेण्याकरिता पोलीस ट्रक मालकाला सोबत घेऊन गेले होते अशी माहिती मिळाली आहे.
नेमका कसा घडला मेटेंचा अपघात
विनायक मेटे रविवारी पहाटे बीडवरुन मुंबईला येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येण्याचा प्रयत्न केला.
विनायक मेटे यांची गाडी त्यावेळी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटले. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही समजायच्या आधीच वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार लागला.
अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून ट्रकचालकाची पाहणी केली. चालक व मालक दोघेही आता पोलिसांच्या ताब्यात आहे.
महत्वाच्या बातम्या
जर लोकांनी निवडून दिलं असेल तर.., मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे सणसणीत उत्तर
A wedding story: ज्या मुलीला मांडीवर खेळवलं नंतर तिच्यासोबतच केलं लग्न, लग्नाची कहाणी वाचून अवाक व्हाल
BJP: बिहारच्या फेरबदलानंतर भाजप झाला सावध, युतीबाबत ‘ही’ नवी रणनीती आखण्याची तयारी
Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या कुटुंबाला ८ वेळा धमकीचा फोन, धमकी देणारा म्हणाला, येत्या तीन तासात…