दोन गटात तेढ निर्माण करत सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राणा दांपत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी राणा दांपत्याने मुंबईच्या हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा मागे घेण्याची मागणी करत राणा दांपत्याने मुंबईत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती राणा दांपत्याने केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर २.३० वाजता सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या याचिकेवर न्यायालय जो काही निकाल देईल तो निकाल राणा दांपत्याला स्वीकारावा लागणार आहे.
शनिवारी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी राणा दांपत्याने अरेरावीची भाषा वापरली होती. तसेच त्यांच्यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. या कारणामुळेच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. न्यायालयाने या दोघांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी करण्यास देखील न्यायालयाने नकार दिला आहे.
यामुळे आता राणा दांपत्याने मुंबईत हायकोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे राणा दाम्पत्यांच्या वकिलाने न्यायालयात या दोघांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली आहे. आता मनसे नेते राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाणे राणा दांपत्याला चांगलेच महागात पडले आहे.
महत्वाच्या बातम्या
नितेश राणेंच्या प्लॅनचा मुख्यमंत्री ठाकरेंनी केला पचका; संतापलेले राणे म्हणतात…
‘या’ महाविद्यालयात शिकवला जाणार पोर्नोग्राफीवर अभ्यासक्रम; वाचा कोर्सची संपुर्ण डिटेल्स..
उद्धवस्त ठ…..ने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अमृता फडणवीसांची जहरी टिका
भारतीय क्रिकेटला धक्का, मुंबईच्या वेगवान गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन