Share

पेशन्टला नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या; भीषण अपघातात चार जण ठार, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

अनेकदा रुग्णवाहिका ही रस्त्यावरून भर वेगात जाताना आपण पाहिली आहे. रुग्णवाहिकेत असणारा रुग्ण गंभीर अवस्थेत असतो, तेव्हा रुग्णवाहिका लवकरात लवकर उपचार व्हावा यासाठी वेगाने जात असते. रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना तिला रस्ता करून देणं ही सर्वांचीच जबाबदारी असते.

मात्र, अनेकदा रुग्णवाहिकेच्या वेगामुळे अपघातांची शक्यता निर्माण होते. अशीच धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. इथे रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

हा अपघात कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील शिरुर गावाजवळ  झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटलेल्या रुग्णवाहिकेनं थेट टोलनाक्याला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा उघडून काहीजण बाहेर फेकले गेले.

या जोरदार धडकेत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह चार जण ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त रुग्णवाहिका रुग्णाला होन्नावरा येथे घेऊन जात होती. रुग्णवाहिका टोलनाक्यावर आली असताना तिथं गाय बसलेली होती. गाय असल्यामुळे चालकाने वेगवान रुग्णवाहिका थांबवण्याचा प्रयत्न केला.

त्या प्रयत्नांत चालकाचे नियंत्रण सुटले आणि  रुग्णवाहिकेने टोलनाक्याला जोरात धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे.या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ टोलनाक्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला अपघाताचा व्हिडीओ २२ सेकंदांचा आहे. त्यात टोलनाक्यावरील कर्मचारी दिसतात. दुरुन येत असलेली रुग्णवाहिका पाहून ते टोलनाक्यावरील बॅरिकेड्स हटवू लागतात. त्यांची धावपळ व्हिडीओमध्ये दिसते.

काहीच सेकंदात रुग्णवाहिका टोलनाक्यावर पोहोचते. भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेवरील चालकाचं नियंत्रण सुटतं आणि ती टोलनाक्यावर धडकते. रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा भीषण धडकेमुळे उघडतो आणि रुग्णवाहिकेतील अनेकजण बाहेर फेकले जातात. या धडकेत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह चार जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now