केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी तरूणांनी या योजनेविरुद्ध हिंसक आंदोलन करत ट्रेन आणि बस पेटवल्या आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हिंसक न होता शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असेच एक शांततापूर्ण आंदोलन हरियाणातील पानिपत येथे पाहायला मिळाले.(Agneepath Yojana, Central Government, Andolan, Video)
पानिपतमधील आंदोलनादरम्यान तरुण आणि तेथे उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अधिकारी आंदोलक तरुणांना समजावून सांगून शांततेने घरी जाण्याबाबत बोलताना दिसत आहेत, याला उत्तर देताना काही तरुण अधिकाऱ्याला विचारत आहेत, साहेब, मला सांगा आमच्या जागी तुमचा मुलगा असता तर तुम्ही काय केले असते? त्यावर अधिकारी म्हणतात की बेटा, मीही तुझ्या वडिलांच्याच वयाचा आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी पानिपतचे डेप्युटी डीएम कमल गिरधर आहेत. पानिपतमध्ये या योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना ते समजावून सांगत आहेत. डेप्युटी डीएम गिरधन म्हणाले की मला तुमचा मुद्दा समजला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायदा हातात घेऊन तुमचे भविष्य खराब करणार. मी तुम्हाला ते करू देणार नाही. या कायद्याबाबत तुम्हाला जी काही अडचण आहे, ती आम्हाला लिखित द्या. मी तुमचा मुद्दा सरकारपर्यंत नक्कीच पोहोचवणार अशी ग्वाही देतो.
#Watch | At Haryana 'Agnipath' Demonstration, An Emotional Moment Between Protester, Official pic.twitter.com/OdWJMbgYfL
— NDTV (@ndtv) June 19, 2022
हरियाणामध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शनिवारी महेंद्रगड रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलकांनी एक वाहन जाळून टाकले होते. त्याच वेळी, शेजारच्या पंजाब राज्यातील लुधियाना रेल्वे स्थानकात ५० हून अधिक आंदोलकांच्या गटाने घुसून मालमत्तेचे नुकसान केले. महेंद्रगडमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, तरुणांच्या एका गटाने पिकअप व्हॅनला आग लावली आणि तिची तोडफोड केली.
गेल्या काही दिवसांपासून महेंद्रगडमध्ये सैन्य भरतीच्या नव्या योजनेच्या विरोधात जोरदार आंदोलने सुरू होती. रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या एका निवासी इमारतीत राहणाऱ्या एका रेल्वे अभियंत्याने सांगितले की, काही आंदोलक त्यांच्या आवारात घुसले आणि त्यांनी कार्यालय आणि जनरेटर सेटचे नुकसान केले. पंजाबमध्ये, ५० हून अधिक तरुणांचा एक गट, कपड्याने तोंड झाकून लुधियाना रेल्वे परिसरात घुसला होता, असे पोलिसांनी सांगितले.
त्या तरुणांच्या गटामध्ये काहींच्या हातात लाठ्या होत्या, त्यांनी खिडक्या आणि तिकीट काउंटरच्या काचा फोडल्या. जालंधरमध्ये तरुणांनी मोर्चा काढून आंदोलने केली. राम मंडी चौक ते पीएपी चौकापर्यंत मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. अग्निपथ योजना मागे घेण्याची त्यांनी केंद्राकडे मागणी केली.
महत्वाच्या बातम्या-
अखेर अग्निपथ योजना केंद्र सरकार मागे घेणार? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, वाचा काय म्हणाले?
नोटाबंदी केली तेव्हा ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आता अग्निपथ योजनेमुळे ओवैसींची मोदींवर टीका
मिल्ट्रीत जाणारा वाघ असल्या पैशांचा हिशोब करत नाय; अग्निपथ योजनेवरुन किरण मानेंचा मोदी सरकारला टोला
अग्निपथ योजनेतून अग्निवीर झालेल्यांना मिळणार १ कोटीचा विमा, ३० दिवसांची सुट्टी, कॅन्टीन सुविधा अन् वाचा सविस्तर