Share

Nashik : गणपतीची मिरवणूक प्रचंड उत्साहात मशिदीजवळ आली अन् तेवढ्यात सुरू झाली अजान..; पुढे जे घडलं असं काही की…

काल नाशिक शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना अजान सुरु झाल्याने शिवसेवा मित्र मंडळाने मिरवणूकीतले वादन थोडा वेळासाठी थांबवल्याची घटना घडली आहे. शिवसेवा मित्र मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत २४ गणेश मंडळे सहभागी झाली होती. मिरवणूक मार्गावरील मशिदीत अजान सुरु झाल्याने शिवसेवा मित्र मंडळाने मिरवणूकीतले वादन थांबवले. शिवसेवा मित्र मंडळानं हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवल्यानं त्यांचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिकमध्ये मुख्य मिरवणुकीत चोवीस मंडळाचा सहभाग होता. महापालिकेच्या गणेश मूर्तीला प्रथम मान देण्यात आला होता. क्रमाने मंडळे मार्गस्थ होत असताना मार्गावरील मशिदीत अजान सुरु होताच त्यातील शिवसेवा मित्र मंडळानं वादन थांबण्याचा निर्णय घेतला.

शिवसेवा मित्र मंडळानं वादन थांबण्याचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाला आहे. अनेकांनी शिवसेवा मित्र मंडळाचं यासाठी कौतुक केले. दरम्यान, नाशिकचे महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल गणेश विसर्जन मिरवणुकीत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्य मिरवणुकीत ढोल वादन केलं.

करोना काळात गेली दोन वर्ष भाविकांना गणपतीचा उत्सव साजरा करता आला नाही. यंदा मात्र प्रशासनाने गणपती उत्सव साजरी करण्यासाठी निर्बंध हटविले. यामुळे घरोघरी व सार्वजनिक मंडळांनी गणपतीचा सण जोरदार साजरा करण्यात आला.

पावसाने मध्येच हजेरी लावल्याने काही ठिकाणी गणपती भक्तांची काहीशी नाराजी पाहायला मिळाली. दहा दिवस गणपतीचा सण मोठ्या उत्साहात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी साजरा केला. अनंत चतुर्थीच्या अखेरच्या दिवशी गणपतीरायाला भक्तीभावाने भाविकांनी निरोप दिला.

इतर

Join WhatsApp

Join Now