Share

पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही केला भारतीय लष्कराला सॅल्यूट; तोंडभरून कौतूक करत म्हणाले..

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्द स्थितीत भारताने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रचार सभेत भारतीय लष्कर भ्रष्टाचारी नसल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारतीय सैनिकांचे कौतुक करण्याची खान यांची दुसरी वेळ आहे.

यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या कामगिरीला सेल्युट केले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, मी भारताला सलाम करतो. ते त्यांच्या लोकांसाठी काम करतात, भारतीय सैन्य भ्रष्ट नाही आणि ते जनतेने निवडलेल्या सरकारमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाहीत. यापूर्वी खान यांनी भारताचे परराष्ट्र धोरण जनतेच्या हिताचे आहे. भारताचे परराष्ट्र धोरण कुणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याचे म्हटले होते.

याचबरोबर, खान यांनी विरोधी पक्षाची भारताशी युती आहे. विरोधक डाकू आहेत. मी राजीनामा देईन, पण कुणापुढे झुकणार नाही असे म्हणत विरोधकांवर निशाना साधला होता. सध्या खान त्यांच्या देशातील राजकीय परिस्थितीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विरोधात पाकिस्तान संसदेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

यामुळे खान यांची खुर्ची कधीही जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने पक्षांतराच्या मुद्द्यावरुन नाराज असलेल्या खासदारांना कारणे दाखवाची नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना येत्या 26 मार्चपर्यंत याबबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

दुसऱ्या बाजूला खान आपले पद वाचविण्यासाठी पुर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे तेथील जनता देखील हैराण झाली आहे. अशातच जर युक्रेनच्या युद्धात पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने उभे राहिला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती अशी टीका विरोधकांनी केली आहे.

मात्र विरोधकांनी केलेले सर्व आरोप खान यांनी फेटाळून लावले आहे. मुख्य म्हणजे अशा तणावपुर्ण स्थितीत खान यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केल्यामुळे यामागचा नेमका हेतू काय आहे असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. सध्या पाकिस्तानी सेना इम्रान खान यांच्या विरोधात उभी राहीली आहे. त्यामुळे या वक्तव्यातून इम्रान खान यांनी पाक सैनिकांवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
पद्म पुरस्कार घेण्यासाठी आलेले 126 वर्षीय स्वामी शिवानंद PM मोदीसमोर नतमस्तक; व्हिडिओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! अखिलेश यादव यांनी दिला राजीनामा, उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ
गोपीचंद पडळकरांनी सेनेच्या ढाण्या वाघाला दिलं खुलं आव्हान; ‘माझ्यासारखं महाराष्ट्रात फिरून दाखवा…’
बांगलादेशला धूळ चारत भारताचा मोठा विजय; वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता सुकर

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now