राजकिय वर्तुळात पक्षातील अंतर्गत मदभेद हा काही नवीन मुद्दा राहिलेला नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चा सर्वांनीच ऐकल्या आहेत. परंतु भाजप पक्षातही अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचे आता समोर आले आहे. मुख्य म्हणजे हे मतभेद थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातच असल्याचे एका भाजप मंत्र्याने उघडकीस आणले आहे.
मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदावर असलेल्या या मंत्र्याने लोकमतच्या अनौपचारिक चर्चेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातील वादाचे गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी काही योजनांबाबत भूमिका मांडली होती. ती फेटाळताना मोदींनी दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यावेळी हिम्मत असेल, तर मला मंत्रिमंडळातून काढून दाखवा, अशी मी मोदींना थेट धमकी दिली होती.
यानंतर मंत्र्याने सांगितले की, माझ्यासोबत २५२ खासदार असून कोणत्याही क्षणी मोदी सरकार पाडण्याचे सामर्थ आमच्यात आहे. सध्या अमित शहा आणि मोदींमध्येही अनेक वाद सुरु आहेत. या घडीला मोदी आत्मप्रेमात मग्न आहेत. संसदेत आपल्या भाषणावर कोणी किती टाळ्या वाजविल्या, हे मोदी स्वत:च्या चेंबरमध्ये बसून मोजत आहेत.
इतकेच नव्हे तर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज यांना योगी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यापासून मोदींनी रोखले होते. राजनाथ सिंह हे आतापर्यंत मोदींशी वाद घालत होते. मात्र, त्यांनीही आता शस्त्रे म्यान केली आहेत असा दावा या मंत्र्याने लोकमतशी बोलताना केला आहे.
यानंतर, सीबीआय, ईडी, आयटी यांसारख्या संस्था मोदी विरोधकांविरोधात वापरत आहेत. मोदींच्या या धोरणाचा मी ही विरोध केला होता. मात्र, मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास याच धोरणाचा वापर करून पार केल्याचे उत्तर मोदींनी दिले असल्याचे या मंत्र्याने सांगितले आहे. मंत्र्याने केलेल्या या दाव्यानंतर मोदी सरकारमध्ये खळबळ माजली आहे.
घराणेशाहीची परंपरा भाजपमध्ये येई नये म्हणून मोदींनी यंदाच्या निवडणूकीत अनेक मंत्र्यांच्या मुलांना निवडणुकीत उभे राहून दिले नव्हते. त्यामुळे भाजपचे अनेक मंत्री मोदींवर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता भाजपच्या या बड्या नेत्याने केलेल्या गौप्यस्फोटानंतर भाजपचे अंतर्गत वाद समोर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
… तर भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींना दिला धोक्याचा इशारा
इम्रान खानची गच्छंती अटळ, विरोधकांनी लावली फिल्डिंग, पाकिस्तानी सचिवालयाकडून अधिसूचना जारी
दोन रुपयांच्या ‘या’ शेअरनं दिला जबरदस्त परतावा; 1 लाखाचे केले तब्बल 13 कोटी रुपये…
इम्रान खानची गच्छंती अटळ, विरोधकांनी लावली फिल्डिंग, पाकिस्तानी सचिवालयाकडून अधिसूचना जारी