जगभरात ११ जुलै हा दिवस ‘लोकसंख्या दिवस’ म्हणून साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हा सध्या जगभरातील सर्व देशांसमोरील महत्वाचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे(Population) प्रदूषण यांसारख्या समस्या वाढत आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जगाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(The population exploding, the situation in India is serious, the people of ‘this’ religion are the most)
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज जगभरात २ ते ४ लाख नवीन मुले जन्माला येतात. आकडेवारीनुसार, दर अडीच सेकंदाला जगात एक बाळ जन्माला येते. दर तासाला जगात ९००० मुले जन्माला येतात. मागील काही वर्षांमध्ये वैद्यकीय सुविधांमध्ये प्रगती झाल्यामुळे जगभरात जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या वाढत आहे.
तसेच आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. भारतात देखील मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. भारत सध्या लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन हा जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पण येत्या काही काळात भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला देखील मागे टाकण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
जगाची लोकसंख्या १ अब्ज होण्यासाठी सुमारे १८०० वर्ष लागली होती. पण त्यानंतर जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. यामुळे सध्या लोकसंख्येचा विस्फोट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विकसनशील देशांमध्ये इतर देशांपेक्षा लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
जगात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. धर्माच्या आधारे लोकसंख्येचा अभ्यास केल्यास महत्वाची माहिती समोर येते. जगभरात सर्वात जास्त लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्मीय लोकांची आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम धर्मीय लोक आहेत. जगभरात एकूण लोकसंख्येच्या ३१ टक्के प्रमाण हे ख्रिश्चन धर्मियांचे आहे. तर २३ टक्के प्रमाण हे मुस्लिम धर्मियांचे आहे.
महत्वाच्या बातम्या :-
…नाहीतर बिश्नोई गँग सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई मागे हटायला तयार नाही
‘या’ 8 क्रिकेट दिग्गजांवर आहे बलात्काराचा आरोप; पांंड्यासह तीन भारतीय खेळाडूंचाही आहे समावेश
९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्याचे करिअर एका चुकीमुळे झाले उद्ध्वस्त, आता करतोय ‘हे’ काम