VIDEO: पोलिस कर्मचाऱ्याने असा रॅप म्हणला की, लोकं झाले हैराण; म्हणाले, हा तर एमिनेमचा बाप निघाला

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया ही अशी जागा आहे, जिथे राजाला रंक आणि रंकाला राजा बनवण्याचे कौशल्य आहे. तुम्ही आजवर देशातील पोलिसांना जनतेचे रक्षण करताना पाहिले असेल. काही पोलिसांचे गाणे आणि नाचतानाचे व्हिडीओही मधेच दिसत आहेत.(the-police-officer-sitting-in-the-car-said-that-the-people-were-blown-away-by-the-rap)

लोक या व्हिडिओंवर प्रेमाचा वर्षाव करतात. रात्रंदिवस अशा प्रकारे जनतेच्या सेवेत गुंतलेले पोलिस जेव्हा लोकांना दिसतात तेव्हा त्यांना नक्कीच खूप आवडते. अशाच एका पोलिसाचा रॅप(Rap) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्याचबरोबर या पोलिसाच्या टॅलेंटचे कौतुक करतानाही थकत नाहीत.

https://www.instagram.com/p/B9dtomSFHbO/?utm_source=ig_embed&ig_rid=0c19c33d-2970-44e8-bd96-8c3135768797

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ विवेक वर्मा नावाच्या इन्स्टा हँडलवर(Insta handle) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही कारमध्ये बसलेला एक पोलिस जबरदस्त रॅप करताना दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या रॅपने लोकांची मने जिंकली आहेत. इंग्रजी आणि हिंदी शब्दांची सरमिसळ करून त्याने ज्याप्रकारे रॅप केले आहे, त्यात मोठे रॅपर्स त्याच्यासमोर अपयशी ठरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जीवन कुमार(Jeevan Kumar) असे या पोलिसाचे नाव आहे. जीवन जम्मू पोलिसात कार्यरत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, “ही एक वेगळीचं लेवल आहे”.

तर दुसर्‍या यूजरने लिहिले, “ये तो एमिनेम का बाप निकला”. अशा प्रकारे लोक या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या पोलिसाचा रॅप तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.