राज्यात उष्णतेने अगदी कहर केला आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणत उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेच वाढत प्रमाण पाहता नागरिक हैराण झाले आहेत. घराबाहेर पडण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत. यामुळे ऑनलाईनवर जास्त भर पडताना पाहायला मिळत आहे.
आपल्या प्रमाणेच डिलिव्हरी बॉयला देखील उष्णतेचा फटका बसत आहे. अशाच एका घामाने डबडबलेल्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीला पोलिस धावून आले आहेत. त्याची अवस्था पाहून त्यांनी एक भन्नाट गिफ्ट देखील दिलं आहे. वाचा नेमकं घडलं काय? नेमकं काय झालं ‘त्या’ डिलिव्हरी बॉय सोबत?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) मधील ही घटना घडली आहे. जय हळदे असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 22 वर्षीय हा जय सायकलवरुन घरोघरी अन्नाचे पार्सल द्यायचा. याबाबत सांगताना विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना तहजीब काझी म्हणतात, ‘रात्रीच्या गस्तीदरम्यान जय हळदे हा अतिशय वेगाने सायकल चालवत असताना घामाघूम होऊन अन्नाचे पार्सल घेऊन जात होता. त्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याच आम्हाला समजलं. तसेच त्याच्याकडे मोटरसायकल घेण्यास पुरेसे पैसे नसल्याचे देखील त्याने आम्हाला सांगितलं.
त्यानंतर आमच्या काही सहकाऱ्यांनी जयला मदत करण्याच ठरवलं असं तहजीब काझी यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आम्ही विजय नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील एका वाहन विक्रेत्याला डाऊन पेमेंट केले आणि हळदे या तरुणाला मोटारसायकल मिळवून दिली, असे त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कौतुकाची बाब म्हणजे या तरुणाने मोटारसायकलचे उर्वरित हप्ते स्वतः जमा करणार असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याचबरोबर या तरुणाने मोटारसायकलबद्दल पोलिसांचे आभार मानले आहे. ‘आधी मी रोज रात्री सायकलने पार्सल पोहोचवत होतो,’ असं त्याने सांगितले. सध्या सर्व स्तरातून या पोलिसांचे कौतुक होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसले मिथुन, मुलाने दिली महत्वाची हेल्थ अपडेट, म्हणाला…
धडाकेबाज खेळीनंतर ऋतुराज गायकवाडने धोनीबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाला, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना…
दोन वर्षांपूर्वीच राणादाने दिली होती अंजलीबाईंवरच्या प्रेमाची कबुली, साखरपुड्यानंतर ‘ती’ पोस्ट चर्चेत
नांदा सौख्यभरे! अखेर विराजस-शिवानीचा विवाहसोहळा संपन्न, पहा लग्नातील खास फोटो