एकता आणि अखंडतेचे अभूतपूर्व दर्शन गणेशोत्सवात दिसून येते. विशेष बाब म्हणजे लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सवामागील असलेला उद्देश कोल्हापूरमध्ये साध्य झाला आहे. कोल्हापुरात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्रपणे गणोशोत्सव साजरा करतात.
विशेष बाब म्हणजे, कोल्हापुरातील बाबूजमाल दर्ग्यावर गणेशाची मूर्ती आहे. इथं हिंदू-मुस्लीम एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करतात. या गणेशोत्सवाची जिल्ह्यात तुफान चर्चा आहे. तसं बघायला गेलं तर, या दर्ग्याचा इतिहास देखील तेवढाच मोठा आहे. इथं एकाच मंडपात मुस्लिमांचे पीर आणि हिंदूंचा गणपती बसतात.
चला तर मग जाणून घेऊ या इतिहास..!
मिळालेल्या महितीनुसार, आदिलशहाने बाबूजमाल दर्ग्याची कमान ही बांधली होती. त्या काळी दक्षिणेवर 3 वेळा स्वारी करूनही पेशव्यांच्या पदरात अपयश आलं होतं. तसेच कर्नाटकवर स्वारी करायला निघालेल्या श्रीमंत पेशव्यांनी कोल्हापूरमध्ये मुक्काम केला होता.
दरम्यान, त्यावेळी पेशव्यांनी या मोहिमेत यश मिळाल्यानंतर दर्ग्याच्या घुमटाचं बांधकाम केलं. आणि तेव्हाच दर्ग्याच्या कमानीवर गणपतीची मूर्ती बसवण्यात आली असं बोललं जातं आहे. गणेशोत्सव काळात या दर्ग्यात भाविकांची मोठी गर्दी होतं असते. सर्व जण मनभावे गणेशाची पूजा करतात.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड