जेव्हा एखादे संकट समोर दिसते, तेव्हा त्या संकटातून आपला जीव वाचवण्यासाठी लोक काहीही करण्यासाठी तयार असतात. अखेरच्या क्षणापर्यंत ते प्रयत्न करतात. अशावेळी कधी कधी अनुभव नसताना देखील सर्व काही जुळून येते. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
विमान हवेत असताना पायलट अचानक आजारी पडला, आणि अशावेळी शून्य अनुभव असलेल्या एका विमान प्रवाशाने विमान चालवून सर्वांना थक्क केले. प्रवाशाने दाखवलेले धाडस पाहून सर्व अवाक झाले. ही घटना पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे.
झालेला प्रकार म्हणजे, विमान हवेत उडत असताना अचानक पायलट आजारी पडला. त्याला विमान चालवणे देखील असह्य झाले. अशावेळी सर्व प्रवाशी घाबरले आणि भगवंताचे स्मरण करू लागले. त्यानंतर शून्य अनुभव असलेल्या एका प्रवाशाने धाडस करून विमान चालवण्याचा प्रयत्न केला. तो पायलटच्या जागी जाऊन बसला.
त्या प्रवाशाने विमानाचा ताबा घेतला. त्याचवेळी कंट्रोल रूमचा पायलटशी संपर्क झाला, तेव्हा विमान एक प्रवाशी चालवत असल्याचे समजले. ऐकून कंट्रोल रूममध्ये खळबळ निर्माण झाली. विमानावर ताबा घेणाऱ्या प्रवाशाला विमान चालवण्याचा अनुभव नसल्याचे त्यांना समजले.
अशावेळी त्यांनी धीराने घेत या प्रवाशाला सूचना देणं सुरू केले. विमानातील परिस्थिती पाहून नियंत्रण कक्षात बसलेल्या लोकांचे होश उडाले. उड्डाण करण्यासाठी कोणत्याही पायलटला 60 तासांचा प्रशिक्षण अनुभव आणि किमान 10 तास एकटे पर्यवेक्षण आवश्यक असते. मात्र या प्रवाशाला याचा काहीच अनुभव नव्हता.
अशावेळी, कंट्रोल रूममधून विमान चालवायला बसलेल्या प्रवाशाला सूचना मिळू लागल्या. नियंत्रण कक्षाकडून पंख्यांची पातळी योग्य राखण्यासाठी आणि उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे स्थिती राखण्यासाठी, किनाऱ्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना मिळाल्या. विमान कसं उतरवायचं याबाबत हवेत प्रशिक्षण सुरू केलं. नंतर या व्यक्तीने विमान व्यवस्थित खाली उतरवले. सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.