Share

पाळीव घोड्याचे करत होती लाड, अचानक घोड्याने केलं असं काही की ती लाजून झाली पाणी पाणी

माणूस आणि प्राणी यांचं नातं खूप खास असतं हे आपल्या सर्वांना माहितच आहे. प्राणी आणि माणूस दोघंही एकमेकांना खूप जीव लावतात. अनेकांना प्राणी पाळण्याची आवड असते. कोणी कुत्रा पाळतं, कोणी मांजर तर कोणी आणखी कोणताही प्राणी पाळते.(The pet was caressing the horse)

काही लोकांना तर प्राण्यांसोबतच राहायला आवडते आणि काही लोक प्राण्यांसोबत राहतात सुद्धा. अनेक लोक प्राणी पाळतात आणि त्यांना मित्र म्हणून सोबत ठेवतात. बरेच लोक प्राण्यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतात, ते प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात.

अनेक प्राणी प्रेमी आपल्या प्राण्यांसोबतच्या मस्तीचे फोटो, व्हिडीओ शेअर करतात. त्यापैकी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये एक महिला आणि तिचा पाळीव घोडा पाहायला मिळत आहे.

ऑगस्टिन नावाची एक महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. टिकटॉक, इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. ऑगस्टिनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला घोडे पाळण्याची आवड आहे. तिच्या घोडेसवारीचं लोकही कौतुक करतात.

ती तिच्या घोड्यासोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये घोड्याने कॅमेऱ्यासमोर केलेलं कृत्य पाहून ऑगस्टिन हसायला लागते. व्हिडीओमध्ये ऑगस्टिन घोड्यांच्या तबेल्यात आहे असे, दिसत आहे. ती घोड्याला प्रेमाने किस करत आहे.

तिचा हा घोडा काळ्या रंगाचा आहे. तो घोडाही तिचे लाड करत आहे. पण अचानक घोडा आपलं तोंड तिच्याकडे आणतो आणि तोंडाने तिच्या टॉपची चेन उघडतो. अचानक अशी गोष्ट झालेली पाहून ऑगस्टिनला लाजल्यासारखे होते आणि ती घोड्याच्या पकडीतून आपला टॉप सोडवत हसायला लागते. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोकांकडून या व्हिडीओला प्रतिसाद मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या
विदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी भारतात होतात नापास, मोठी माहिती आली समोर
करोडोंची संपत्ती असतानाही आपल्या मुलाला मोजून पैसै देतो अक्षय कुमार, कारण वाचून कौतुक वाटेल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now