Mukesh Ambani, Reliance Foundation Hospital, Antilia, Accused/ उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला बिहारमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईनवर अज्ञात व्यक्तीने कॉल केला आणि हॉस्पिटल उडवून टाकू, असे सांगितले. यासोबत फोन करणाऱ्याने मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि मुलगा आकाश यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील अंबानींचे घर अँटिलिया मी उडवून देईन, असेही त्याने सांगितले होते. मुंबई पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, आमच्या टीमने बिहारमधील दरभंगा येथून धमकीच्या फोन कॉल प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबईचे झोन 2 चे डीसीपी नीलोत्पल यांनी सांगितले की, बुधवारी मध्यरात्री आरोपीला पकडण्यात आले.
बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाइनवर फोन करून धमकी दिली. गेल्या दोन महिन्यांतील मुकेश अंबानींना धमक्यांची ही दुसरी घटना आहे. असाच एक फोन या वर्षी ऑगस्टमध्ये आला होता. या प्रकरणाचा तपास केला असता, फोन करणारा 56 वर्षीय ज्वेलर्स विष्णू विधू भौमिकी असल्याचे पोलिसांना आढळले. त्याला बोरीवली येथून अटक करण्यात आली.
फोनवर त्याने स्वत:ला अफजल गुरू म्हटले होते आणि तीन तासांत तो अंबानींना हानी पोहोचवू शकतो, असे सांगितले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नुकतेच केंद्र सरकारने मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा कवच दिले आहे. यापूर्वीही त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा मिळाली होती. वाढलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. धमकी दिल्यानंतर बुधवारी पोलिसांनी रुग्णालय आणि अँटिलियाची सुरक्षा वाढवली होती.
बुधवारी दुपारी12.57 वाजता रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन फोनवर कॉल आला. फोन करणार्याने धमकी दिल्यावर हॉस्पिटल प्रशासनाने त्याच वेळी पोलिसांना माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्याने फोन करणाऱ्याला बराच वेळ बोलण्यास सांगितले. यानंतर रुग्णालयातील विविध अधिकाऱ्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला. हा संवाद 4/5 मिनिटे चालला. यादरम्यान पोलिसांना फोन करणाऱ्याचे लोकेशन कळले.
प्रकरण हायप्रोफाइल असल्याने त्याचवेळी मुंबई पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आणि त्यांनी मध्यरात्री धमक्या देणाऱ्या आरोपीला पकडले. आरोपींनी मोबाईल क्रमांकावरून रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर कॉल केला होता. त्यांनी रुग्णालयाच्या वेबसाइटवरून लँडलाइन क्रमांक घेतला होता. अंबानींच्या सुरक्षेत सहभागी असलेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांनी बुधवारी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.
महत्वाच्या बातम्या-
Mukesh Ambani: अंबानी कुटुंबाला २ तासात ८ वेळा फोन करून जीवे मारण्याची धमकी देणारा विष्णू भौमिक कोण आहे?
Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या ५ सर्वात मौल्यवान गोष्टी, ६५० कोटींची टॉय कंपनी ते १२ हजार कोटींचे घर
Mukesh ambani : मुकेश अंबानींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन; दान केले ‘एवढे’ कोटी, आकडा ऐकून डोळे फिरतील