Share

संजय राऊतांवर ज्यामुळे ईडीची धाड पडली ते पत्राचाळ प्रकरण नेमके आहे तरी काय? जाणून घ्या

sanjay raut ..

शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक जाऊन धडकलं. संजय राऊत यांची कसून चौकशी सुरु आहे. पत्राचाळप्रकरणी ईडीकडून ही कारवाई केली जात आहे. (The patrachal case that led to the ED’s raid on Sanjay Raut?)

ईडीद्वारे एवढी मोठी कारवाई संजय राऊतांवर होत आहे. त्यामध्ये त्यांना अटक होण्याची पण शक्यता आहे. ज्या प्रकरणामुळे हे घडून येत आहे, ते पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरण काय आहे? हे आपण जाणून घेऊया.

गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण ( म्हाडा) चा मोठा भूखंड आहे. प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला या चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. त्यासंबंधी म्हाडाशी त्यांच्या कंपनीचा करार झाला होता.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला ३ हजार फ्लॅटचे बांधकाम पत्राचाळ भूखंडावर करायचे होते. त्यातील ६७२ फ्लॅट तेथील भाडेकरूंना देऊन उरलेले फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटप होणार होते. परंतु या कन्स्ट्रक्शनने २०१० साली २५८ % शेअर्स एचडीआयएलला विकले.

जमिनीचा काही भाग इतर भागीदारांना परस्पर विकण्यात आला. ४७ एकर जमिनीबाबत १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा मोठा घोटाळा ईडीच्या लक्षात आल्यावर प्रवीण राऊत यांना अटक झाली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या फार जवळचे मानले जातात. प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर ८३ लाख रुपयाची रक्कम पाठवल्याचे समोर आले.

त्यानंतर संजय राऊत कुटुंबीयांनी त्या रकमेतून दादर येथे एक फ्लॅट विकत घेतला. आता ईडीची चौकशी संजय राऊत आणि कुटुंबीयांच्याभोवती त्यामुळेच सुरू आहे. त्यांच्या सर्व संपत्तीवर ईडीने टाच लावत पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
ईडीच्या धाडीनंतरही संजय राऊतांनी फोडली डरकाळी! ‘मरेण पण शरण जाणार नाही’
ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रीया; ‘बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो..’
‘मी जेव्हा मुलाखत देईल तेव्हा राज्यात नाही, देशात मोठा भूकंप होईल’; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now