Share

नशीब! पेंटरवर होतं लाखोंचं कर्ज, घर विकायच्या दोन तास आधी लागली ‘एवढ्या’ कोटींची लॉटरी

एका व्यक्तीच्या डोक्यावर लाखोंचे कर्ज होते. घर विकणार होते, तयारी सुरू होती. घर खरेदी करणाऱ्याकडून टोकन अॅडव्हान्स मिळणार होते की त्या व्यक्तीला 1 कोटींची लॉटरी(Lotary)लागली. घर विकण्यापूर्वी अशाप्रकारे नशीब उघडण्याचे हे प्रकरण केरळमधील मंजेश्वर भागातील सांगितले जात आहे.(the-painter-had-a-loan-of-lakhs-two-hours-before-the-sale-of-the-house)

50 वर्षांचे मोहम्मद बावा(Mohammad Bava) हे पेंटर आहेत. कर्जामुळे बावा आपले घर विकणार होते, असे वृत्त आहे की, घर विकण्याच्या 2 तास आधी त्यांना 1 कोटींची लॉटरी लागली. मोहम्मद बावा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपली एकमेव मालमत्ता विकून भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला होता.

वृत्तानुसार, बावा आणि त्यांची पत्नी अमिना(Amina) यांना पाच मुले आहेत. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. दोन मोठ्या मुलींचे लग्न झाले असून दोन मुली शाळेत जातात. त्यांचा 22 वर्षीय मुलगा निजामुद्दीन याला तीन आठवड्यांपूर्वी कतारमधील एका इलेक्ट्रिकल दुकानात सेल्समनची नोकरी मिळाली.

मुलींच्या लग्नानंतर आणि घराच्या बांधकामानंतर बावा कर्जबाजारी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्यावर बँका आणि नातेवाईकांचे सुमारे 50 लाख रुपयांचे कर्ज होते आणि मुलगा निजामुद्दीनला कतारला पाठवण्यासाठी त्यांनी पैसेही घेतले होते.

बावा सांगतात की, गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण खूप तणावाखाली होता. उत्पन्न खूपच कमी असल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. कर्ज फेडण्यासाठी मोहम्मद बावा आपले 2 हजार चौरस फुटांचे घर 40 लाख रुपयांना विकून भाड्याच्या घरात राहण्याच्या तयारीत होते. त्यांचे घर आठ महिन्यांपूर्वीच बांधले होते.

बावा घराच्या विक्रीसाठी टोकन अॅडव्हान्स घेणार होते. पण असे काही होण्याआधीच बावाने लॉटरी जिंकली. रविवारी, 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बावाचे कुटुंब त्यांच्या घराच्या खरेदीदाराची वाट पाहत असताना बावा बाहेर आला आणि बाजारात गेला.

केरळ(Keral) सरकारच्या फिफ्टी-फिफ्टी लॉटरीची चार तिकिटे त्यांनी खरेदी केली. त्या दिवशी दुपारी 3 वाजता चिठ्ठी काढण्यात आली आणि बावांना समजले की त्यांची लॉटरी लागली आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांनी घर विकण्यास नकार दिला. वृत्तानुसार, 1 कोटींच्या लॉटरीतून टॅक्स वजा केल्यावर बावांना सुमारे 63 लाख रुपये मिळतील.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now