Share

Rahul Bhatia: ३८ हजार कोटींचा मालक चहात बुडवून खात होता पार्ले-जी, फोटोने जिंकली लोकांची मनं

Ratan Tata, Rahul Bhatia, Parle G Biscuits, Photos, Social Media/ देशातील अब्जाधीश व्यक्ती आकाशातील ताऱ्यांपेक्षा कमी नाहीत. सामान्य लोकांना ते टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात पाहायला मिळतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांचे एक वेगळेच विश्व आहे. अशा स्थितीत रतन टाटा (Ratan Tata) किंवा आदी दिग्गज उद्योगपतींना पाहणे हा चर्चेचा विषय ठरतो. तसेच अशा दिग्गजांना भेटण्याची अनेकांना ओढ असते.

यावेळी साध्या जीवनशैलीचे उदाहरण देशातील प्रसिद्ध विमान कंपनी इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांनी मांडले आहे. आपल्या साध्या वागण्याने ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. खरंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ते विमानाच्या प्रवासादरम्यान सामान्य व्यक्तीप्रमाणे चहात पार्ले जी बिस्किटे बुडवून खाताना दिसत आहे.

राहुल भाटिया यांचा हा फोटो पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडिगो एअरलाइन्सचे प्रवर्तक आणि एमडी राहुल भाटिया यांचा हा व्हायरल फोटो बेंगळुरू ते दिल्ली दरम्यान विमानाने प्रवास करतानाचा आहे. या फोटोमध्ये ते पार्ले जी बिस्किटे चहात बुडवून खाताना दिसत आहे.

राहुल भाटियाच्या साधेपणाच्या या चित्राने लोकांची मने जिंकली आहेत. आता सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. अनेक ट्विटर युजर्सनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून राहुल भाटिया यांचा हा फोटो शेअर करून त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात 5 रुपयांचे पार्ले जी बिस्कीट घेऊन खाणारे राहुल भाटिया अब्जाधीश आहेत.

वृत्तानुसार, राहुल भाटिया आणि त्यांचे वडील कपिल भाटिया यांची रिअल टाइम नेट वर्थ सुमारे 38,000 कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर लोक राहुल भाटिया आणि विजय मल्ल्या यांची तुलना करत आहेत. वायपी राजेश नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. या विमान प्रवासादरम्यान ते राहुल भाटिया यांचे सहप्रवासी होते.

या संदर्भात वायपी राजेश यांनी लिहिले, “अब्जाधीश राहुल भाटिया हे इंडिगोच्या बंगलोर-दिल्ली फ्लाइट दरम्यान माझे सहप्रवासी आहे. ते इंडिगो एअरलाइनचे प्रवर्तक आणि एमडी आहेत. राहुल चहात बुडवून पार्ले-जी बिस्किटांचा आस्वाद घेत आहे. 57% मार्केट शेअर असलेली यशस्वी एअरलाइन कंपनी चालवण्यासाठी तुम्हाला रिचर्ड ब्रॅन्सन किंवा विजय मल्ल्या असण्याची गरज नाही.”

महत्वाच्या बातम्या-
Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालानंतर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा मालक कोण होणार? समोर आली ‘ही’ नावे
जेव्हा भारताचे विमान हायजॅक झाले तेव्हा पाकिस्तानने केली मदत, किस्सा वाचून विश्वास बसणार नाही
Chief Minister : दारूच्या नशेत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवले?; आपचे भगवंत मान यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या आर्थिक व्यवसाय

Join WhatsApp

Join Now