Share

South America: ‘या’ ठिकाणी सापडले जगातील सगळ्यात जुने झाड, नाव आहे ग्रॅन अबुएलो, असं काय खास आहे त्यात?

Gran Abuelo

South America, Gran Abuelo, Computer Model, Scientist/ तुम्ही पृथ्वीवरील सर्वात जुने झाड ऐकले आहे का? दक्षिण अमेरिकन (South America) देश चिलीमध्ये एक प्राचीन वृक्ष आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, हे झाड सुमारे 5400 वर्षे जुने आहे. हे सर्वात जुने झाड असू शकते असा दावाही या झाडाबाबत केला जात आहे. मात्र, असा दावा करण्यापूर्वी त्याबाबत अधिक माहिती गोळा करावी लागणार आहे.

आकाश व्यापणाऱ्या या विशाल वृक्षाचे नाव आहे ग्रॅन अबुएलो (Gran Abuelo). नवीन संगणक मॉडेलसह, हे झाड 5400 वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्याच्या नेमक्या वयाच्या माहितीबाबत शास्त्रज्ञांमध्ये शंका आहे. मात्र अद्याप कोणीही याबाबत ठोस मत व्यक्त केलेलं नाही.

ग्रॅन अबुएलोचे नेमके वय निश्चित करण्यासाठी, डेंड्रोक्रोनोलॉजी पद्धतीद्वारे त्याचे परीक्षण करणे बाकी आहे. पॅरिसच्या हवामान शास्त्रज्ञावर विश्वास ठेवला तर हा महाकाय वृक्ष अजूनही धोक्यात आहे. त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. वाढत्या पर्यटनामुळे हे झाड धोक्यात आले आहे. याशिवाय वातावरणातील बदलामुळे झाडावरही मोठा परिणाम झाला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, चिलीमधील अलर्स कोस्टेरो नॅशनल पार्कमध्ये उपस्थित असलेले ग्रा अबुएलो वृक्ष अलर्स प्रजातीचे आहे, त्याची उंची सुमारे 60 मीटर आहे. पूर्वी हे विशाल वृक्ष 3500 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात होते. मात्र, 2020 मध्ये, जोनाथन आणि त्याच्या टीममेट्सना त्यांच्या संशोधनात आढळले की या झाडाच्या कड्या 2465 वर्षे जुन्या आहेत.

त्याच वेळी, संगणक मॉडेलच्या संशोधनात, शास्त्रज्ञ या झाडाचे वय 5400 सांगत आहेत, परंतु या झाडावर अजून संशोधन होणे बाकी आहे. त्यानंतर त्याचे नेमके वय कळेल. कॅलिफोर्नियातील पाइनचे झाड सर्वात जुने मानले जायचे. या झाडाचे नाव मेथुसेलाह आहे. त्याचे वय 4853 वर्षे आहे. आता चिलीच्या जंगलात असलेले ग्रॅन अबुएलो वृक्ष हा विक्रम मोडू शकतो.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thakre: एक गुलाब गेला तर फरक पडत नाही, माझ्याकडे गुलाबाचे झाड, मी नवीन गुलाब फुलवीन – उद्धव ठाकरे
Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल
Jharkhand : परीक्षेत कमी गुण दिल्याने संतापले विद्यार्थी; शिक्षकाला झाडाला बांधून केली जबर मारहाण

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now