केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ऑनलाइन कॅब सेवा कंपन्या Ola आणि Uber यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांच्या उल्लंघनाबाबत जारी करण्यात आली आहे. सीसीपीएचे म्हणणे आहे की, गेल्या एका वर्षात दोन्ही कंपन्यांच्या विरोधात लोकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत, त्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी प्राधिकरणाने ओला आणि उबेरला १५ दिवसांची मुदत दिली आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नोटीसबाबत माहिती देताना सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, आम्ही Ola आणि Uber या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरात अनेक समस्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली. दोन्ही कंपन्यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, १० मे रोजी सरकारने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांची बैठक बोलावली होती. यानंतर, बैठकीची माहिती देताना ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह म्हणाले होते, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १० मे रोजी कॅब सेवा कंपन्यांसोबत दुसरी बैठक घेतली. ओला, उबेर, मेरू, रॅपिडो आणि फायरफ्लायचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
कंपन्यांनी आपल्या यंत्रणेत सुधारणा करून ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल न घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला. नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन (NCH) च्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२१ ते १ मे २०२२ पर्यंत ओला विरोधात ग्राहकांनी २४८२ तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याचवेळी उबेरविरोधात ७७० तक्रारी दाखल झाल्या होत्या.
ओलाच्या बाबतीत, ५४% तक्रारी सेवांमधील कमतरतेशी संबंधित होत्या, तर उबेरच्या बाबतीत, हा आकडा ६४ टक्के होता. त्यादृष्टीने ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सीसीपीएने दोन्ही कंपन्यांना सांगितले आहे की, योग्य ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा नसणे, सेवांमधील कमतरता, रद्दीकरण शुल्क जास्त आणि भाडे वसूल करणे या तक्रारी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. वैध ISI मार्क नसलेल्या आणि आवश्यक BSI मानकांचे उल्लंघन करणार्या वस्तू खरेदी करण्यापासून ग्राहकांना सावध करण्यासाठी CCPA ने सुरक्षा सूचना देखील जारी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
त्वरा करा! ओला स्कुटर मोफत मिळवण्याची संधी, भाविश अग्रवालने आणल्या जबरदस्त ऑफर्स
पाण्यावर चालणारी सायकल ते मिनी वॉटर पंप, ६० वर्षांच्या वृद्धाचे संशोधन पाहून अवाक व्हाल
पतीच्या अफेअरबाबत कळताच या अभिनेत्रीने असा घेतला बदला, परपुरुषासोबत बनवले विवाहबाह्य संबंध
सोलर फ्रीजमुळे विजबिल झाले कमी, ८० टक्क्यांपर्यंत मिळतेय सबसिडी, महिन्याला १५ हजारांचा फायदा