मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक रचनेला मोठा हादरा बसवणारा बंड पक्षात घडून आला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून थेट शिवसेनेवरच दावा सांगितला आणि हे प्रकरण थेट न्यायालयात गेले. (The new Chief Justice of India will be born from Konkan)
न्यायालयात शिवसेना पक्ष विरुद्ध शिंदे गट अशी लढाई सुरू आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात खंडपीठांसमोर प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या खंडपीठाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा आहेत. परंतु २६ ऑगस्ट रोजी ते निवृत्त होणार आहे. या प्रकरणाचा निकाल त्यांच्या निवृत्ती आधी लागेल अशी चिन्हे तर सध्या दिसत नाहीत.
एन.व्ही. रमणा हे पदावरून निवृत्त होत असतानाच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव देखील केंद्र सरकारला सुचविले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश लळीत आपले उत्तर अधिकारी असतील, असे त्यांनी सांगितले.
उदय उमेश लळीत म्हणजेच ‘यु यु लळीत’ हे आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पुढील नवे सरन्यायाधीश असतील. या गोष्टीवर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. ते ४९ वे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते २६ ऑगस्टनंतर पदाचा कार्यभार सांभाळतील.
यु यु लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे आहेत. त्यांचे आजोबा वकिली करण्यासाठी सोलापुरात स्थायिक झाले. तिथूनच या कुटुंबाची नाळ विधी क्षेत्राशी कायमची जोडली गेली. महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय घडामोड घडत असताना नव्या सरन्यायाधीशांचे येणे या प्रकरणाला कोणते नवे वळण देईल. हे येत्या काळात पहावे लागेल.
उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून ज्येष्ठ वकील सोराबजी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. अनेक वर्ष लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली करत होते. २०१४ पासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. आता ते सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ असेल मंत्रिमंडळाची संभाव्य यादी; आश्चर्याचा धक्का देणारी दोन नावे भाजपकडून मंत्रिपदासाठी निश्चित
Rahul gandhi: राहुल गांधींनी स्विकारला लिंगायत पंथ, मठातील संतांनी दिला पंतप्रधान होण्याचा आशिर्वाद
Sanjay Raut: ‘मला ह्रदयविकाराचा त्रास, छोट्या खोलीत ठेवल्याने तिथे पुरेशी हवा येत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो’