एका टीव्ही चैनलच्या चर्चेत गरीब नवाज फाउंडेशनचे चेअरमन मौलाना रजा यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना, नवरात्रीच्या काळात मांस कापण्यावर विरोध दर्शविला आहे. कोणत्याही परिस्थितीत नवरात्रीत मांस कापले गेले नाही पाहिजे असे रजा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत सहमती दाखवली आहे.
रजा यांच्या वक्तव्यापूर्वीच बेंगळुरू महानगरपालिकेच्या अखत्यारीतील भागात रामनवमीनिमित्त 10 एप्रिल रोजी कत्तलखाने आणि मांसची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दक्षिण आणि पूर्व दिल्लीच्या महापौरांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मांसाची दुकाने नवरात्रीदरम्यान बंद ठेवण्यास सांगितली होती.
परंतु या आदेशाचे कोणीच पालन न केल्याचे दिसत आहे. अनेकांनी दुकाने सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. याकाळातच अल्पसंख्याक आयोगाने महापौरांना नोटीस बजावत घेतलेल्या निर्णयाविषयी जाब विचारला आहे. नवरात्रीच्या दिवशी मांसची दुकाने बंद ठेवण्यास का सांगितली आहेत असा सवाल आयोगाने विचारला आहे.
दरम्यान यानंतरच एका टीव्ही चॅनेलच्या डिबेटमध्ये चेअरमन मौलाना रजा यांनी नवरात्रीच्या दिवसात मांस कापण्यास मनाई केली आहे. यावेळी, आपण सर्वांच्या भावनांचा मान ठेवला पाहिजे, तुम्ही जर मांस खात नसाल तर तुमच्या भागात मांस कापले गेले नाही पाहिजे असे रजा यांनी म्हटले आहेत.
या डिबेटमध्ये त्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली आहे. याचबरोबर मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले आहे. सध्या एका मुस्लीम व्यक्तीने हिंदुंच्या उत्सवांचा मान ठेवल्यामुळे रजा यांचे कौतुक होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
पवारांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्यामुळेच सदावर्तेंना अटक – पत्नीचा गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावले
सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करा; जुही चावल्याच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी फटकारले
सुप्रिया सुळे यांच्यात मला इंदिरा गांधी दिसल्या; जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ७७ सालची घटना!