इंडियन प्रीमियर लीगची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने अनेक खेळाडूंचे नशीब बदलले आहे. कारण त्यांनी अशा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत होती. पण आयपीएलमध्ये एमआयमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली.(the-mumbai-indians-player-cried-when-he-saw-the-meal)
आयपीएलमध्ये खेळायला येणाऱ्या खेळाडूंना भरघोस रक्कम दिली जाते, त्यामुळे गरीब कुटुंबातून आलेल्या क्रिकेटपटूंची आर्थिक स्थिती भक्कम होते. आज आपण एका अशा खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने गेल्या एक वर्षापासून दुपारचे जेवण केले नाही. त्यामुळे जेवण पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आले.
मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाचा 24 वर्षीय युवा स्पिन गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंग नुकताच एमआयमध्ये सामील झाला असून त्याला मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी दिली होती. त्यादरम्यान कार्तिकेयने 4 षटकांत केवळ 19 धावा देत महत्त्वाची विकेट घेतली. कार्तिकेय सिंगची आर्थिक परिस्थिती नेहमीच बिकट राहिली आहे, त्यामुळे त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
जिथे कुमार कार्तिकेय सिंगची(Kartikeya Singh) क्रिकेट अकादमी होती, तेथून सुमारे 80 किमी अंतरावर गाझियाबादजवळील मसुरी नावाच्या गावात तो मजूर म्हणून काम करायचा. कार्तिकेय काम करत असलेल्या कारखान्याजवळ त्याने भाड्याने खोली घेतली होती. कार्तिकेय रात्रभर कारखान्यात काम करायचा, मग सकाळी क्रिकेट अकादमीत जायचा. 10 रुपये वाचवण्यासाठी कार्तिकेय अनेक वेळा मैल पायी चालत जात असे.
कुमार कार्तिकेय सिंगचे प्रशिक्षक संजय भारद्वाज(Sanjay Bhardwaj) यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी सांगितले की तु या परिसरात का राहत नाही. कार्तिकेयने मग कारखान्यातील काम, रात्रीची शिफ्ट आणि खडतर प्रवास याबद्दल सांगितले. त्यानंतर कार्तिकेयच्या प्रशिक्षकाने त्याला स्वयंपाकीजवळच्या जागेवर राहण्यास सांगितले.
कार्तिकेयचे प्रशिक्षक संजय भारद्वाज सांगतात की, जेव्हा कार्तिकेय त्याच्या अकादमीत पहिला दिवस थांबला होता आणि त्यादरम्यान स्वयंपाकाने त्याला जेवण दिले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून दुपारचे जेवण न केल्याने कार्तिकेय रडू लागला. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने अलीकडेच जखमी मोहम्मद अर्शद खानच्या(Mohammad Arshad Khan) जागी कुमार कार्तिकेय सिंगचा संघात समावेश केला आहे. त्यानंतर राजस्थानविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात कार्तिकेयने संजू सॅमसनला बाद केले.