शुक्रवारी दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. एका दिवसात चित्रपटाने 8 ते 10 कोटी कमवले आहेत. यातून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिल्याचे दिसत आहे.
खास करुन अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेविषयी सर्वत्र चर्चा झाली आहे. झुंड चित्रपट सत्य घटनेशी प्रेरित आहे. या चित्रपटातील खरा नाईक विजय बरसे नामक व्यक्ती आहे. ते ‘स्लम सॉकर’चे संस्थापक आहेत. विजय बरसे यांनी या संस्थेमार्फत झोपडीत राहणाऱ्या मुलांच्या मनात फुटबॉलविषयी प्रेम निर्माण केले. या मुलांचे आयुष्य एका फुटबॉल स्पर्धेने बदलून टाकले.
आता याच घटनेवर आधारीत झुंड चित्रपटाने झुंडच्या कलाकारांचे आयुष्य बदलून टाकले आहे. सध्या झुंड चित्रपट हाऊसफुल चालला आहे. यातील सर्व कलाकारांना प्रेक्षकांकडून प्रेम भेटत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटातील सर्व कलाकारांना सामान्य कुटुंबातून घेतले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सुध्दा नागपूर सारख्या ठिकाणी करण्यात आले आहे.
त्यामुळे हा चित्रपट हिंदी असला तरी बघताना वास्तववादी वाटत आहे. मुख्य म्हणजे हिंदीत चित्रपट असला तरी त्याला सर्वात जास्त पंसती मराठी प्रेक्षकांकडून मिळाली आहे. दरम्यान नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात.
यापूर्वी सैराट, फॅंड्री सारख्या समाजातील वास्तव दाखवणाऱ्या चित्रपटांना नागराज मंजुळे यांनीच दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटांनी अनेक टीकांचा सामना सुध्दा केला आहे. परंतु तरी सुध्दा नागराज मंजुळे आपल्या भूमिकांवर स्पष्ट असलेले दिसून आले आहेत. आता देखील अनेकांनी झुंड चित्रपटावर सुध्दा टीका केली आहे.
यात दाखवण्यात आलेले कलाकार, अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका यावर काहींनी सवाल उपस्थित केले आहेत. परंतु यांना देखील सडेतोड उत्तर नागराज मंजूळे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘झुंड’मध्ये ज्या विजय बरसेंची भूमिका अमिताभ यांनी साकारली त्यांची खरी स्टोरी माहिती आहे का?
‘झुंड’ मुळे बदललं २० वर्षाच्या मुलाचं आयुष्य; मानले नागराज मंजुळे याचे आभार
दारूच्या नशेत गाडीला धडक मारलेल्या ‘त्या’ क्रिकेटरचा व्हिडीओ व्हायरल, अवस्था पाहून चाहतेही भावूक…
VIDEO: ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के’, धर्मेंद्र यांनी फार्महाऊसमधील रंगीबेरंगी फुलांची दिली माहिती