हिंगलाज नामक व्यक्ती हे उदयपूरचे पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांची आई वाळवंटातील गावात राहते. आईचे नाव धापुकंवर आहे. ग्रामीण भागात राहणारी ही धापुकंवर आपला मुलगा कलेक्टर झाला असून देखील अगदी साधपणाने राहते मुलगा कलेक्टर आहे, याचा ती बडेजाव करत नाही.
आपल्या मुलाच्या यशाबद्दल आणि त्याच्या साधेपणाबद्दल विचारले असता धापुकंवर म्हणते, आमच्याकडे वीस गाया आहेत. दोन मुलं शिक्षक असून एक शेतीत काम करतो. त्यातला हिंगलाज सर्वात लहान असून, त्यानं मेहनतीने हे यश मिळवले आहे. मात्र मुलगा कलेक्टर झाला म्हणून त्याच्या सोबत इतर ठिकाणी गाव सोडून जावं वाटत नाही.
हे वाळवंट सोडून कुठेही जाऊ वाटत नाही. या गावातच राहायला आवडते. रोजची कामे करायला आवडतात. या मातीती लहानाचे मोठे झालो आहोत. मुलगा जरी कलेक्टर झाला आणि दुसऱ्या ठिकाणी गेला असला तरी, त्याची देखील या मातीशी नाळ तुटत नाही. जेव्हा तो नोकरीवरून गावात येतो तेव्हा कोणताही बडेजाव न करता पूर्वीसारखाच राहतो.
त्यानंतर भिंयाड गावचे आयएएस रमेश जांगीड हे सध्या वैष्णोदेवी साइन बोर्डचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील शिक्षक आहेत. आई आणि वडील दोघेही भिंयाड गावात राहतात. मुलगा आयएएस आहे याचा कोणताही बडेजाव ते मिरवत नाहीत. गावाशी त्यांचं नातं घट्ट झालं आहे. त्यामुळे ते सोडून कुठेही जात नाहीत.
त्यांची आई शेतीची कामे करते. मुलगा कलेक्टर झाल्यानंतरही वागण्यात अजिबात बदल झालेला नाही. गाईचे दूध काढायचे, इतर कामे करायची ही तिची नित्याचीच कामे आहेत. तिला विचारले असता म्हणते, मुलगा कलेक्टर झाला आहे मी नाही. तिच्या बोलण्यातून तिचा साधेपणा लपत नाही.
तसेच, दांडाली गावातील गंगासिंह राजपुरोहित हे 2016 च्या बॅचचे IAS आहेत. सध्या गुजरातमधील छोटा उदयपूर येथे जिल्हाधिकारी आहेत. त्यांची आई मतकोनदेवी दांडली गावात राहते. ग्रामीण वातावरणातील सर्वसामान्य गृहिणी मतकोदेवी सांगतात की, मुलगा कलेक्टर झाल्यानंतर एक-दोनदा सोबत गेलो, पण मला गावाच आवडते.
मतकोनदेवी या शेतीचे कामे करतात. गाया सांभाळतात. मुलगा कलेक्टर झाला, याचा त्यांना अभिमान आहे. कलेक्टरची आई आहे असे लोक म्हटल्यावर बरे वाटते, असे त्या म्हणतात. पण ज्या गावात राहतो ते अधिक आवडते, रोजचे साधेपणाचेच जीवन छान वाटते, असे त्या म्हणतात.