ठाणे(Thane): इंटरनेटच्या जमान्यात घराघरांत काहीसे बाजूला पडलेले दूरदर्शन अलीकडे घरगुती भांडणाचे मूळ कारण बनले आहे. अशीच घरगुती वादातून सासूची तीन बोटे कापल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये घडली. म्हातारी सासू देवाच्या ध्यानात आणि स्तोत्रात मग्न होती. दरम्यान, सून टीव्हीवर काही कार्यक्रम पाहत होती. यावेळी टीव्हीचा आवाज मोठा होता, त्यामुळे सासूबाईंना त्रास होत होता.
अशा स्थितीत त्यांनी आवाज कमी करायला सांगितला. तरीही सुनेने ते ऐकले नाही म्हणून टीव्ही बंद करण्यात आला. यानंतर सुनेला राग आला आणि तिने सासूशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि दोघींमधील बाचाबाची इतकी वाढली की तिने सासूची बोटे कापली. यादरम्यान नवरा बचावासाठी गेला असता त्यालाही सुनेने मारहाण केली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात ६० वर्षीय रुषाली कुलकर्णी राहतात. मुलगा आणि सून विजया कुलकर्णी (३२) हेही त्यांच्यासोबत राहतात. शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने बुधवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली की, टीव्हीचा आवाज कमी करण्याच्या वादात महिलेने तिच्या वृद्ध सासूची तीन बोटे कापली.
पोलिस स्टेशन ऑफिसरच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी रुशाली घरात भजन करत असताना तिची सून विजया टीव्ही पाहत होती. यावेळी रुशालीने पूजेत व्यस्त असल्याने विजयाला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले. यानंतर तिने टीव्ही बंद केला, यामुळे संतापलेल्या सुनेने रुशालीचा हात पकडून तिची तीन बोटे कापली.
विजयाने बचावासाठी आलेल्या पतीलाही मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आपल्या सूनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातून अनेकांना जीवही गमवावा लागतो. घरातील एकमेकांचा राग करणे, संपत्तीसाठी घरातील एखाद्याची हत्या करणे अशी प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत.
नुकतीच एक घटना अशी घडली की, संपत्तीच्या नादात नातवाने आजीची गळा दाबून हत्या केली व तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिले. या नातवाला व त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तशीच घटना दिल्लीतही घडली आहे, पती पत्नी दोघांचे फ्लॅटच्या विक्री वरून भांडण झाले आणि पतीने घरातील बायको, मुल आणि स्वतःवरही चाकूने वार केला.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray: ठाकरेंना मोठा धक्का; दहा वर्षे आमदार असलेला कोकणातील बडा नेता शिंदे गटात सामील
Amit Shah : अमित शहांचा सुरक्षा घेरा तोडून त्यांच्या मागेपुढे करणारा धुळ्याचा हेमंत पवार कोण? पोलिसांनी केलीये अटक
Sanjay Shirsat :’या’ कारणामुळेच आम्ही पक्ष सोडला; याकूब मेनन प्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना आलं टेंशन, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर ‘हे’ आमदार पुन्हा करणार घरवापसी?






