Share

27 मंदिरे पाडून बांधली गेली कुतुबमिनार जवळील मशीद, प्रसिद्ध इतिहासकारांचा मोठा दावा

महाराष्ट्रात सध्या भोंग्याच्या वादावरून धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये बोलत असताना
प्रसिद्ध इतिहासकार डॉ. के.के. मोहम्मद यांनी एक वेगळाच दावा केला आहे. ‘दिल्लीतील कुतुबमिनारजवळील कुव्वत उल इस्लाम मशीद 27 मंदिरे पाडून बांधण्यात आली होती.’ असे मोहम्मद यांनी आपल्या दाव्यात म्हणले आहे.

त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा खळबळजनक स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक वारसा दिनानिमित्त भोपाळ मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मोहम्मद यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली होती. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मोहम्मद यांनी म्हणले, हा प्रदेश चौहानांची राजधानी होता. या भागात 27 मंदिरे होती जी मशीद बांधण्यासाठी पूर्णपणे नष्ट करण्यात आली होती. याठिकाणी गणेशजींसह अनेक मूर्ती होत्या. मशिदीच्या जागेवर अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आहे. एवढेच नाही तर, ताजूर मासीर नावाच्या पुस्तकातही या गोष्टीचा उल्लेख आहे.

तसेच, “कुतुबमिनार केवळ भारतातच बांधला गेला नाही. तर त्याआधी तो समरकंद आणि गुवरामध्येही बांधला गेला होता. कुतुबमिनारची संकल्पना पूर्णपणे इस्लामिक आहे.” असे मोहम्मद यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, अनेक मंदिरांचे अवशेष दिल्लीतील कुतुबमिनारजवळ सापडले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यापूर्वी मोहम्मद यांनी रामजन्मभूमीच्या वादावर वक्तव्य केले होते. तेव्हा त्यांनी, “बहुतेक मुस्लिमांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जमीन देण्याचे मान्य केले होते, परंतु त्यांना डाव्यांनी चिथावणी दिली होती. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर श्री राम मंदिराचे अवशेष त्यांनीच शोधून काढले होते.” अशी माहिती दिली होती.

सध्या मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर देखील याविषयी अनेकजण वेगवेगळी मते नोंदविताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या
सर्वात पहीले ‘हे’ भोंगे बंद करा; बच्चू कडूंनी दिलेले चॅलेंज सर्वच राजकीय पक्षांना झोंबणार?
आता दरमहा तुमच्या खात्यात 10,000 रूपये जमा होणार, सरकारने आणली नवीन योजना
मुंबईतील मशिदींचा मोठा निर्णय! ७२% मशिदी पहाटेचे भोंगे स्वताहून बंद करणार
भाजपा नेत्याचा घरचा आहेर; ‘आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास नरेंद्र मोदी अपयशी’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now