Share

साहेबांना पाहताच क्षणी मला समजलं की.., विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा धक्कादायक खुलासा

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र विनायक मेटे यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. (the shocking revelation of Vinayak Mete’s doctor wife)

ज्योती मेटे या पेशाने डॉक्टर आहेत. विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर घडलेल्या घडामोडी आणि वैद्यकीय टर्मिनोलॉजीच्या आधारे ज्योती मेटे यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘मला फोन येताच मी अक्षरशः धावत सुटले. मी विश्वास नांगरे पाटील यांना फोन केला. पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर असलेल्या माझ्या भावाला फोन केला. त्यांनी कोणी फोन उचलला नाही.’

‘मग मी वाहतूक पोलिसांना फोन केला. कारण साहेबांच्या गाडीवरचा ड्रायव्हर सांगत नव्हता तो कुठे आहे? त्याला ठिकाण माहिती नव्हतं तर, मी गुगल लोकेशन पाठव, असं सांगितलं. पण ते त्याने केलं नाही.’

‘शेवटी वाहतूक पोलिसांकडून कळलं की, एमजीएम कामोठे रुग्णालयात साहेबांना दाखल केला आहे. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तेही तिथे पोहोचले होते. फक्त पाऊण तासाच्या आत मी त्या ठिकाणी आले.’

पुढे त्या म्हणाल्या की, ‘मी डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहताक्षणी मला समजलं की, काहीतरी वाईट घडलंय. मेडिकल टर्मिनोलॉजीनुसार, मृत्यू झाल्यानंतर एवढ्या लवकर माणूस पांढरा पडत नाही. परंतु साहेबांचा चेहरा पांढरा पडला होता. नाकातून, कानातून रक्त येत होतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मी त्यांच्या हाताची नाडी, मानेची नाडी तपासली. पण हाती लागत नव्हती. इसीजीमध्ये पण काहीच हालचाल दिसत नव्हती.

यानंतर मी माझ्या भावाला सांगितलं की, ‘फोन आल्यानंतर पाऊण तासात मी या ठिकाणी पोहोचले. ही घटना पाऊण तासापूर्वी घडलेली दिसत नाही. ही घटना घडून किमान दोन तास उलटून गेले असावेत. म्हणजेच आमच्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. लपवलं जात नसेलही, परंतु काय आहे? हे नक्की माहित नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालात सगळ्या गोष्टी कळेलच आणि अपघात घडल्याची वेळही समजेल, असं ज्योती मेटे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-
जर लोकांनी निवडून दिलं असेल तर.., मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे सणसणीत उत्तर
A wedding story: ज्या मुलीला मांडीवर खेळवलं नंतर तिच्यासोबतच केलं लग्न, लग्नाची कहाणी वाचून अवाक व्हाल
Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या कुटुंबाला ८ वेळा धमकीचा फोन, धमकी देणारा म्हणाला, येत्या तीन तासात…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now