shivsena : शिंदेगटात गेलेल्या आमदाराने केली एकनाथ शिंदेंची पोलखोल, सगळंच काढलं बाहेर

shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यानंतर तात्पुरते निर्णय प्रक्रियेदरम्यान धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटातील निष्ठावान आमदार दुखावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गुवाहाटी रिटर्न असलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर परखड केली आहे.

नितीन देशमुख म्हणाले, ‘आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असे सांगत शिंदे गट वेगळा झाला. मात्र धनुष्यबाण चिन्ह गोठवा असा अर्ज ते सर्वोच्च न्यायालयाकडे करतात. यामुळे ते कोणता बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत. कोणती शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. या गोष्टीचे आत्मचिंतन त्यांनी करायला हवे.’

हा सर्व भाजपचा कट आहे. रामाचे धनुष्यबाण गोठवण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यामुळे रामाचे नाव घेऊन देशात आणि महाराष्ट्रात मत मागण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही, असा खोचक टोला नितीन देशमुख यांनी भाजपला लगावला. पुढे ते असे म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर क्षणार्धात ही बातमी सगळीकडे पसरली. उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्याचप्रमाणे आज उद्धव साहेब जे कोणते चिन्ह घेतील. ते क्षणार्धात सगळ्याच ठिकाणी पोहोचेल.’

‘उद्धव साहेब जे कोणते चिन्ह घेतील. त्यामागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, असाही ठाम निर्धार यावेळी देशमुख यांनी व्यक्त केला. बोलताना ते म्हणाले की, ‘शिंदे गटाचा शिवसेना संपवण्याचा डाव होता. शिवसेना आपली असून धनुष्यबाण भविष्यात आपल्यालाच मिळेल, असे सांगत एकनाथ शिंदेंनी सोबत असणाऱ्या आमदारांची फसवणूक केली.’

मात्र जेव्हा निवडणूक आयोगाचा निर्णय येईल. त्यानंतर मात्र या आमदारांना सावरता- सावरता त्यांचा वेळ निघून जाईल. या आमदारांना आता काय उत्तर द्यावे, या विचारानेच एकनाथ शिंदेंना घाम फुटला असेल,’ अशा शब्दात देशमुख यांनी शिंदे गटा विरोधात टीकास्त्र सोडले.

नितीन देशमुख यांनी शिंदे गटाबद्दल आपला संताप व्यक्त केला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे त्यांना झालेल्या दुःखाला त्यांनी अशा प्रकारे वाट करून दिली. मात्र हेच नितीन देशमुख शिंदे गटाने बंडखोरी केल्यावर त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र दोनच दिवसानंतर नितीन देशमुख पुन्हा मुंबईत परतले. आपल्याला फसवून नेण्यात आले होते. मी पळून येण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी माध्यमांसमोर शिंदे गटावर केले होते.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : निवडणुक आयोगाला देण्यासाठी ठाकरे गटाने बनावट शपथपत्रे बनवली; शिंदे गटाचे पुराव्यानिशी उद्धव ठाकरेंवर आरोप
Air force : ‘या’ १० देशांचे हवाई दल आहे सगळ्यात शक्तिशाली आणि धोकादायक, भारताचा नंबर कितवा?
Abdul Sattar : शिंदे गटातील वाद चिघळला; भडकलेल्या सत्तारांची मुख्यमंत्री शिंदेंच्या समोरच तुफान शिवीगाळ