Share

मंत्र्याच्या मुलीचा पळून जाऊन प्रेमविवाह; आता म्हणते मला वडीलांपासून धोका; पोलीसांकडे केली ‘ही’ मागणी

मंत्र्याची मुलगी एक व्यवसायिकासोबत पळून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मंत्र्याने पोलिसात मुलीचे अपहरण झाले असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुलीने आज तिच्या आणि तिच्या पतीच्या संरक्षणासाठी पोलिसांना मदत मागितली आहे. त्यामुळे नेमकं प्रकरण काय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

तामिळनाडूचे मंत्री डॉ. पी.के. शेखर बाबू यांची मुलगी घरातून पळून गेली होती. शेखर बाबू यांनी त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली. शेखर बाबू हे एमके स्टँलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाचे मंत्री आहेत.

मुलीचं नाव जयकल्याणी आहे. माहितीनुसार, तिनं बंगळुरू शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांच्याकडे सुरक्षेची विनंती केली आहे. तिनं पत्रकारांना सांगितले की, माझं व्यवसायिक सतीश कुमार त्यांच्याशी लग्न झालं आहे. दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी पळून जाऊन लग्न केले.

आता तिच्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचं तिनं म्हटलं आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हंटले आहे की, जयकल्याणीनं आपल्या वडिलांकडून तिला आणि तिच्या पतीला धोका असल्याचं सांगितलं आहे. कारण, तिच्या वडिलांचा तिच्या या लग्नाला विरोध आहे.

वडिलांकडून आपल्याला धमकावलं जात असल्याचा आरोप तिनं केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्री शेखर बाबू आपल्या मुलीच्या या नात्यावर खुश नव्हते. या जोडप्याला लग्नासाठी मदत करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकातील जिल्हा मुख्यलय असलेल्या रायचूर येथील हलस्वामी मठात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे या जोडप्याचं लग्न झालं आहे.

आता शेखर बाबू यांनी पोलिसात मुलीच्या अपहरणाची तक्रार केली होती, मात्र मुलगी स्वतः येऊन पत्रकारांना तिला आणि तिच्या पतीला धोका असल्याचं सांगत असल्यानं नेमकं शेखर बाबू यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका आहे का याबद्दल चर्चा होत आहे.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now