2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराला मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1545 अंकांनी घसरला, तर निफ्टी 450 च्या जवळ घसरून 17150 वर पोहोचला. सेन्सेक्समधील या मोठ्या घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या कमाईवर झाला आणि एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी डुबले.
सोमवारी दुपारपर्यंत सेन्सेक्स 1,900 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी 596 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, संध्याकाळी, सेन्सेक्स 1545 अंकांनी घसरला तर निफ्टी 17150 अंकांनी घसरला आणि बंद झाला. आज सर्वात मोठी घसरण आयटी सेक्टर, रिअल्टी, मेटल सेक्टरमध्ये झाली आहे. आजच्या घसरणीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले.
गेल्या पाच दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. सेन्सेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्समध्ये 3300 अंकांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, निफ्टी 1100 अंकांनी घसरला आहे. यामध्ये 5.4 टक्के घट झाली असून, गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीची अनेक कारणे आहेत. शेअर बाजारातील घसरणीची पाच कारणे सांगायचे तर विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजारावर दबावाची स्थिती आहे. त्याच वेळी, यूएस फेड रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदारही घाबरले आहेत. पेटीएम, कारट्रेड, पीबी फिनटेक सारख्या टेक शेअर्समध्ये मोठ्या घसरणीचाही परिणाम होत आहे. त्याचवेळी, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, रशिया-युक्रेन सीमेवर वाढत तणाव,चालनवाढीमुळे बाजारावर दबाव आला आहे. या घसरणीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा म्हणजेच एफपीआय चा मोठा हात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच परकीय गुंतवणूकदार भारतीय मार्केटमधून पैसे काढून घेतले जात असून ते इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपिन्समध्ये गुंतवण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) सतत बाजारातून पैसे काढत आहेत. रिअल इस्टेट, निफ्टी स्मॉलकॅप, मिडकॅप यांसारख्या निर्देशांकांमध्ये ब्रेकडाउन स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे बाजारातील घसरण सध्या कायम राहू शकते असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.






