Share

‘राजकारणाचे डावपेच चालूच राहतील, पण राज्यकारभार थांबायला नको, जनतेची कामं थेट माझ्याकडे आणा’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये असे सांगितले आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या या राजकीय अस्थिरतेच्या काळात लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालूच राहतील पण या दरम्यान राज्य कारभार थांबायला नको, जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेवू नका, ती थेट माझ्याकडे घेऊन या.

तसेच या बैठकीत त्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. तसेच कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता यासंबंधित सूचना दिल्या.

त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकर्‍यांच्या सुविधा याविषयी महत्त्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेवू नका , ती थेट तातडीने माझ्याकडे घेऊन या असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात आणखी शिंदेंनी केलेल्या बंडामुळे चालू झालेला राजकीय पेज सुटला नाही. यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोर आमदारांना आव्हान दिलं होतं. म्हणाले, माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, असे म्हणाले होते.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now