Share

न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकीलाने ९ वर्षे केले महिलेचे लैंगिक शोषण, पतीसोबत होते वाद

पुण्यातील दत्तवाडीच्या हद्दीत न्याय मिळवून देणाऱ्या वकिलानेच महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेने न्यायाची मागणी करत आरोपी विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे न्याय मिळवून देणारेच असे करत असतील तर नक्की न्याय कोणाकडे मागायला जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयातील सर्व खटले चालवून न्याय मिळवणून देतो असे आमिष दाखवून आरोपी वकिलाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. संबंधित महिलेचे आपल्या पतीसोबत वाद सुरु होते. यामुळे न्यायाची मागणी करत महिला आरोपी वकिलाकडे गेली होती. परंतु यावेळी वकिलानेच महिलेवर अत्याचार केले. तसेच महिलेला न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

जवळपास गेल्या 9 वर्षांपासून आरोपी पिडीत महिलेचे जबरदस्तीने लैंगिक शोषण करत होता. परंतु आपल्या पाठीशी कोणीच उभे राहणार नाही या भितीने पिडीत महिला सर्वकाही सहन करत होती. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीवर लैंगिक शोषणासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपीचे नाव नंदकुमार डिकोजी पाटील असून त्याचे वय 64 वर्षीय आहे. आरोपी नंदकुमार पुण्यातील विजयनगर कॉलनी परिसरातील रिमझिम बंगल्यातील रहिवासी आहे. पिडीत महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. तसेच महिलेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

दरम्यान पिडीत महिला पतीसोबत सुरु असलेल्या वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकटी राहत आहे. तिला कुणाचाही आधार नाही. अशात पतीसोबतच्या वादात न्याय मिळावा म्हणून पिडीत महिला आरोपी वकिलाकडे मदतीच्या आशेने गेला होती. परंतु महिलेच्या लाचारीचा वकिलानेच फायदा घेतला.

यापुर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात न्याय मिळवून देणाऱ्यानेच पिडीतेचे शोषण केले आहे. यामुळे न्याय कोणाला मागावा असावा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिलेला एकट पाहून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनांनी तर सर्व सीमाच पार केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
एकता कपूरच्या ‘या’ वेबसिरीजने तोडल्या अश्लीलतेच्या सगळ्या सीमा, सीन्स पाहून तुम्हालाही फुटेल घाम
‘पावनखिंड’च्या यशानंतर दिग्पाल लांजेकर घेऊन येणार ‘हा’ ऐतिहासिक चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
युद्ध संपणार? अखेर रशियाने युक्रेनसमोर ठेवली ‘ही’ अट, युक्रेनसमोर आहे आता एकच पर्याय

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now