Share

…अन् अकरा वर्षीय मुलाच्या जीवनाची दोरच तुटली; वाचा पतंग उडविताना नेमकं असं घडलं तरी काय?

kite

दरवर्षी नायलॉन मांजाने अनेकजण जखमी होतात. अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. नगरिकांसोबत पक्षांनाही नायलॉन मांजाने अनेक जखमा झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तसेच अशीच एक घटना नागपूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एका मुलाचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

या घटनेने नागपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकरा वर्षीय मुलगा टेरेसवरून पतंग उडवित होता. मात्र पतंग उडविता-उडविता त्याचा तोल गेला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मयूर शाहू असं मृतकाचं नाव आहे. अवघ्या ११ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच चायनीज मांजाने यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तनुश्री विलास पारखीला जखमी केले आहे. सकाळी आठच्या सुमारात तनुश्री एका मैत्रिणीला घेऊन शाळेत सराव परीक्षेसाठी जात होती.

जाणून घ्या चायनीज मांजा कशापासून तयार करण्यात येतो. चायनीज मांजा याला प्लास्टिक मांजा असेही म्हणतात. चायनीज मांजा हा इतर मांजासारखा धाग्याने बनवला जात नाही. हा नायलॉन आणि धातूची पावडर मिसळून तयार केला जातो. हे प्लास्टिकसारखे वाटते आणि ताणण्यायोग्य आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा ते खेचले जाते तेव्हा ते तुटण्याऐवजी वाढते. तो मांजा ब्लेडसारखा धारदार असून त्याच्या विक्रीवर बंदी आहे, मात्र बंदी असतानाही त्याची खुलेआम खरेदी-विक्री सुरू आहे. अनेकांनी चायनीज मांजाने आपला जीव गमावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘भांडून लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं’; अभिनेत्रीची पोस्ट तूफान व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?
मी तीन वेळा तयार झालो होतो पण.., धर्मेंद्र यांनी सांगितले लता दीदींच्या अंत्यसंस्काराला न येण्याचे कारण
“कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार?”
जया बच्चन यांनाही झाला कोरोना; धर्मेंद्रसोबतच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले…

क्राईम इतर राज्य

Join WhatsApp

Join Now