मुंबई। लॉकडाऊनमुळे अनेक कलाकारांना घरात बसावे लागले. मात्र आता सगळे पाहिल्यासारखे झाल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एकदा सर्व सिनेमागृह सुरळीत चालू झाले आहे. तसेच आता हिंदी, तमिळ, मराठी, इंग्लिश, चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजेच सिनेमाघरात प्रदर्शित होताना दिसत आहे. तसेच आतापर्यंत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर लाखोंची कमाई केली आहे.
आल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ ने बॉक्स ऑफिसवर लाखोंची कमाई केली आहे. आणि आता बाहुबली स्टार प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभासचा बिग बजेट असलेला चित्रपट ‘राधे श्याम’ ११ मार्चलाच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.
दरम्यान बाहुबली प्रभासला टक्कर देणारा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट देखील ११ मार्चला पेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती. एकीकडे बाहुबली स्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट.
तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहे. बाहुबलीच्या यशानंतर प्रभासचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटासमोर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट किती चालेल याबाबत थोडी शंकाच होती.
मात्र, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाला प्रभासचा कोणताच फटका बसलेला दिसत नाही. कारण कमी बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट वरचढ ठरतोय याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
जाणून घेऊया पहिल्या दिवशीची दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई:
‘राधे श्याम’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास १५ कोटींची कमाई करत धमाकेदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाने केवळ हिंदी व्हर्जनच्या माध्यमातून ४.५० कोटींचा गल्ला जमा केला आहे. पण, बॉक्स ऑफिस इंडियाच्या म्हणण्यानुसार, जरी ‘राधे श्याम’ने तेलुगूमध्ये उत्तम कमाई केली असली, तरी राज्याबाहेर मात्र हवीतशी सुरुवात केलेली दिसत नाही.
तसेच दुसरीकडे ‘द काश्मीर फाइल्स’ ने देखील तुफान सुरुवात केली आहे. अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लोकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली आहे. कमी बजेटच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केल्याने कोणता चित्रपट वरचढ ठरणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’ VIDEO: अमिताभ यांना विचारला सेक्सी मुलींबद्दल ‘हा’ प्रश्न, अभिषेकने उत्तर देताच करणची बोलती झाली बंद ‘तुला कोणी हात लावला तर मला सांग’, माफियांपासून वाचवण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने धरला होता शाहरूखचा हात ‘थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची..’, विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत






