‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. चित्रपट पाहून अनेकांना आपले अश्रू आवरणे कठिण होत आहे. प्रेक्षकांसोबत अनेक सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. तर चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आता हा चित्रपट ओटीटीवरही स्ट्रीम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी यासारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
११ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.५५ कोटींची जबरदस्त कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी, रविवारी १०.५० कोटी, सोमवारी १५.०५ कोटी असे एकूण चित्रपटाने ४२.२० कोटींची कमाई केली आहे. अद्यापही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे.
While *most films* crash/fall on the crucial Monday, #TheKashmirFiles is on a RECORD-SMASHING SPREE… Mon is similar to Sun… #TKF is a SMASH-HIT… On course to be a BLOCKBUSTER… Fri 3.55 cr, Sat 8.50 cr, Sun 15.10 cr, Mon 15.05 cr. Total: ₹ 42.20 cr. #India biz. pic.twitter.com/yyd2qbwcB1
— taran adarsh (@taran_adarsh) March 15, 2022
सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही हा चित्रपट धमाल करण्यास तयार आहे. झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम करण्यात येणार आहे. झी ५ च्या अधिकाऱ्यांनीही याबाबत पुष्टी केली आहे. परंतु झी ५ वर हा चित्रपट येणार असला तरी कधीपासून हा चित्रपट स्ट्रीम करण्यात येणार याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. पण ओटीटीवरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. त्यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन चित्रपटासाठी त्यांचे कौतुक केले. याशिवाय, कंगना राणावत, अक्षय कुमार, आर. माधवन, परेश रावल, परिणीती चोप्रा यासारख्या कलाकारांनीही सोशल मीडियाद्वारे चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये गेले असते; ‘आई कुठे काय करते?’ फेम अश्विनी महांगडेचा खुलासा
IMDb ने ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे घटवले रेटिंग; दिले ‘हे’ धक्कादायक कारण…
आता आपण फक्त दिवस मोजायचे..; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला