Share

‘द काश्मीर फाईल्स’ चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

सध्या बॉक्सऑफिस वरती अनेक सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. त्यामध्ये कोणता सिनेमा किती कमाई करत आहे, याची चर्चा सुरू आहे. अशातच, विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्सऑफिसवरील इतर सिनेमांना टक्कर देत असल्याचं चित्र दिसत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाची भरपूर चर्चा होत आहे. काश्मीर पंडितांवर होणाऱ्या अन्यायाची, त्यांच्या आस्थापनाची कथा सांगणारा हा सिनेमा आहे. सध्या या सिनेमामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे.

या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर तीन दिवसामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवारी 15.05 कोटी तर मंगळवारी 18 कोटींची कमाई ‘द काश्मीर फाईल्स’ ने केली आहे. दिवसेंदिवस याचा गल्ला वाढत चालला आहे.

तर दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई कठियावाडी सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 25 फेब्रुवारी ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने आतापर्यंत 109.50 कोटी इतकी कमाई केली आहे. या सिनेमाची तुलना जर ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाशी केली तर नक्कीच येत्या काळात  ‘द काश्मीर फाईल्स’ गंगुबाई सिनेमाला मागे टाकेल.

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती सारखे दिग्गज कलाकार आहेतच पण त्याचबरोबर पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार सारखे अनुभवी कलाकार देखील या सिनेमात भूमिका करत आहेत.

https://twitter.com/taran_adarsh/status/1503950074103042051?t=CcKp_7K-SkPMd_W8mC-wKQ&s=19

या सिनेमाचा एवढा गल्ला होण्यामागे नक्कीच दुसरे देखील एक मोठे कारण म्हणजे, राजकिय वर्तुळात होणारी या सिनेमाची चर्चा. लोकसभेत देखील या चित्रपटाबद्दल बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात या चित्रपटावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहे. तर काही राज्यांनी हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी होत आहे.

 

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now