विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमा शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. काश्मिर बद्दल नेहमीच आपल्याला काही ना काही ऐकायला मिळत असते. इथल्या स्थानिकांचे जीवन अत्यंत अस्थिर आहे. आजच जगणे उद्या नशिबात असेल की नाही ही जाणीव मनात अन् जीव मुठीत ठेऊन ते लोक जगत असतात.(“The Kashmir Files”, grabbed the director’s legs)
अशाच काश्मिर मध्ये १९९० साली काश्मिरी पंडीतांसोबत जे घडले ते कितीतरी जणांना माहितच नसेल. पण विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ या सिनेमातून १९९० साली काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांच्या अत्याचारामुळे आपलेच घर सोडून जीव वाचवण्यासाठी पळावे लागले होते.
सर्व काश्मिरी पंडितांची पीडा, त्यांचा छळ, त्यांच्यासोबत घडलेल्या सगळ्या विदारक गोष्टी या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमातून काश्मिरचे ते सत्य मोठ्या पडद्यावर मांडत असताना अनेक अडचणी आल्या आहेत. पण अखेर सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
अनेक संकटांना पार करुन अखेर ११ मार्च २०२२ ला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत चक्क १९९० सालात ज्या काश्मिरी पंडितांसोबत ते दृष्टकृत्य घडले होते. त्या कृत्याला बळी गेलेल्या कुटुंबातील एक महिला सिनेमा पाहण्यासाठी उपस्थित होती.
सिनेमा पाहिल्यानंतर ती महिला प्रेक्षक अक्षरश: रडू लागली होती. तिने थेट जाऊन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे पाय पकडले. सिनेमातील कलाकारांचे आभार मानताना तिचा आवाज कातरत होता. तिला शब्दच फुटत नव्हते. सिनेमाच्या निमित्ताने ती १९९० चा साल पुन्हा जगली होती.
https://www.instagram.com/reel/CbCC74_oRN6/?utm_medium=copy_link
काश्मिरी पंडितांसाठी सिनेमाच्या माध्यमातून उठवलेल्या आवाजाने ती भारावून गेली होती. तिच्या भावना पाहून सिनेमातील कलाकरांचेही अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वादांमुळे चर्चेत आला होता. सुरुवातीला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सिनेमा प्रदर्शित करू नका अशा धमक्या आल्या होत्या. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सिनेमाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याने रंगलेला वाद आणि सिनेमातून एक सीन काढावा लागल्याची चर्चा अशा बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या.
मात्र अखेर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर, दर्शन कुमार, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी अशा दर्जेदार कलाकारांनी काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांना अटक होणार? राज ठाकरेंनी सुचक विधान करत सांगितली आतली खबर
दाऊदचा भाचा महाविकास आघाडीत सक्रीय? राणेंनी शेअर केलेल्या फोटोमुळे उडाली खळबळ