Share

“सामान्य माणसाला ह्रदयाचे ठोके सांभाळायला जमणार नाही म्हणून..”, कपिलने असं म्हणताच लाजली माधुरी

सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ या शोने चाहत्यांचे नेहमी मनोरंजन केले आहे. या शोने चाहत्यांना खूप हसवले आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्यात कलाकार पाहुणे म्हणून हजेरी लावत असतात. आपल्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी कलाकार या शोमध्ये येतात.

याच दरम्यान या शोमध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि संजय कपूर येणार आहेत. अशामध्ये कपिल शर्मा या दोन कलाकारांसोबत खूप मस्ती करत त्यांची चेष्टा करताना दिसून येईल. नुकताच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिलने माधुरी दीक्षितला पती डॉ. श्रीराम नेनेबद्दल असे काहीतरी म्हणतो की, ज्यावर माधुरी लाजत प्रतिक्रिया देते.

कपिल माधुरीला म्हणतो की, “सामान्य माणसाला नाही जमणार हृदयाचे ठोके सांभाळायला. याच कारणामुळे माधुरी मॅडमने हृदयाच्या डॉक्टरशी लग्न केले आहे.” जेव्हा कपिल माधुरीला असे म्हणतो तेव्हा माधुरी लाजत हसायला लागते. त्याचबरोबर उपस्थित सर्वजण खूप हसू लागतात.

 

तसेच कपिल माधुरीला पुढे म्हणतो की, “जेव्हा डॉक्टर नेनेनी पहिल्यांदा तुमचा हात धरला होता. तेव्हा त्यांनी ‘माझ तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हटले होते की दुसर्‍या डॉक्टरला बोलवा, माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहेत, असे म्हंटले होते.” यावर पुन्हा एकदा माधुरी लाजते आणि हसायला लागते.

मात्र कपिल एवढ्यावरच थांबत नाही, पुढे तो अभिनेता संजय कपूरला प्रश्न विचारतो. कपिल म्हणतो की, “सर तुम्ही ‘राजा’ या चित्रपटानंतर खूप वर्षांनी एकत्र काम करत आहात. जेव्हा दिग्दर्शकाने तुमच्याशी संपर्क साधला आणि माधुरी दीक्षित तुमच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. असे सांगितल्यानंतर तुम्ही स्क्रिप्ट विचारली की कुठे पोहोचायचं? हे विचारलात” यावर संजय कपूरने उत्तर म्हणतो की, “त्याचे बोलणं पूर्ण होण्याअगोदरच मी गाडीत बसलो होतो.” हे ऐकून पुन्हा एकदा सर्वजण हसू लागतात.

माधुरी दीक्षित आणि संजय कपूर ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. या नेटफ्लिक्स वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित आणि संजय कपूर पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर समोर आला आहे. यामधून ग्लॅमरच्या दुनियेमागील सत्य काय आहे? या कथेमध्ये आराम शोधत विवाहबाह्य संबंधांच्या वर्तुळात कसे अडकतात हे दाखवले आहे.

त्याचबरोबर माधुरी दीक्षित या वेब सीरिजमध्ये ‘अनामिका आनंद’ ची भूमिका साकारत आहे. जी व्यवसायिक अभिनेत्री असते. तिच्या या वेब सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर करताना माधुरीने सांगितले होते. सध्या माधुरीची ही भूमिका खूप चर्चेत आहे.

 

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now