बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट शुक्रवारी (११ मार्च) प्रदर्शित झाला. प्रदर्शनापासून हा चित्रपट चर्चेत असून यामधील अनेक सीनबाबत वादसुद्धा होत आहेत. यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील एका न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यामधील एक सीन हटविण्यास सांगितल्याचे वृत्त समोर येत आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दिवंगत स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना यांच्यावर आधारित दृश्य दाखवण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. दिवंगत स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांच्या पत्नी निर्मला खन्ना यांच्याद्वारे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
या याचिकेत निर्मला खन्ना यांनी आपल्या पतीशी संबंधित दृश्य हटविण्याची मागणी केली आहे. तसेच सत्य परिस्थिती न दाखवता काल्पनिकतेचा आधार घेऊन मनोरंजन तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे.
रवी खन्ना हे २५ जानेवारी १९९० रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या हल्ल्यात वायुसेनेतील ४ अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ)चे प्रमुख यासीन मलिकच्या नेतृत्वाखालील एका समूहाने केला होता.
जम्मूचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दीपक सेठी यांनी चित्रपटातील सीन हटविण्यासंदर्भात निर्मात्यांना आदेश दिले आहेत. या आदेशात त्यांनी म्हटले की, रवि खन्ना यांच्या पत्नी निर्मला खन्नाद्वारे सांगण्यात आलेले तथ्य पाहता चित्रपटात शहीद स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना यांच्यासंबधित कार्य दाखवणारे सीन दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काश्मीरमधील या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रभासच्या ‘राधे श्याम’ ला ‘द काश्मीर फाइल्स’ देणार टक्कर..! पहिल्याच दिवशी केली एवढ्या कोटींची कमाई
हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’
‘थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची..’, विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत






