Share

‘खाजगीकरणाची खाज वाढायला लागली, अजून कुठे कुठे खाजवणार?’; उद्धव ठाकरेंचा केंद्राला खोचक सवाल

केंद्र सरकारने एलआयसीमधील हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. त्यातच एलआयसीमधील फक्त 5 टक्के हिश्शाची विक्री केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता या मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते बोलले की, खाजगीकरणाची खाज वाढायला लागली आहे. कुठे-कुठे खाजवणार आणि काय-काय खाजगीकरण करणार याची कल्पना नाही. एलआयसीतही खासगीकरण सुरु झाले आहे.

म्हणाले, कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, दीप म्हटलं की उजेड पडतो. पण इकडे भवितव्यच अंधारात जात असेल, तर मग आपल्या संघटनेचं काम महत्वाचं असतं. जरी कुणी दुसऱ्या संघटनेचे असेल तरी ते आपलेच आहेत म्हणून त्यांच्यासाठी न्याय हक्काची लढाई लढली गेलीच पाहिजे.

जेव्हा जेव्हा तुमच्यावर कोणी वार करेल, त्या- त्या वेळी त्या वाराचा मुकाबला करण्याची हिंमत आपल्या भगव्यात आहे, हे तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. केंद्राने अनेक कंपन्या उद्योजकांच्या घशात घातल्या हेही त्यांनी सांगितले.

याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एलआयसीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. भारताची सर्वात मौल्यवान संपत्ती असलेल्या एलआयसीला केंद्र सरकार कवडीच्या किंमतीत का विकत आहेत, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता.

माहितीनुसार, भारतीय बाजारांच्या इतिहासातील सर्वात मोठा असलेल्या एलआयसीचा आयपीओची आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री झाली आहे. 9 मे पर्यंत आयपीओ विक्रीसाठी खुला आहे. हा आयपीओ घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now