भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहानी त्यांच्या खेळीसारखीच इंटरेस्टिंग राहिली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची Love Story भारी आहे. भारतीय संघात आशिष नेहराची ओळख एक हसतमुख चेहरा म्हणून आहे.
गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चे नुकतेच विजेतेपद पटकावलं आहे. विजयाचं क्रेडिट अनेकांनी टीमचा मुख्य प्रशिक्षक माजी भारतीय क्रिकेटर आशिष नेहरा याला दिलं आहे. इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा मोसम गुजरात टायटन्स या संघासाठी संस्मरणीय ठरला आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत होता.
आशिष नेहराबद्दल फार कमी लोकांना त्याच्या पर्सनल लाईफबद्दल माहिती आहे. आशिष नेहराची लव्ह स्टोरी फार मनोरंजक राहिली आहे. द ओव्हलमध्ये २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान आशिष नेहरा त्याच्या पत्नीला पहिल्यांदा भेटला होता.
पहिल्या भेटीमध्ये आशिष नेहराला रूश्मा आवडली होती. आशिष नेहरा आणि रूश्मा यांच थोड्या दिवसांनी बोलणं देखील सुरू झालं होतं. रूश्मा आणि नेहरा यांच मैत्रिचं नात प्रेमामध्ये झालं होतं. जवळपास दोघांनी ७ वर्ष एकमेकांना लपून-छपून डेट केलं आहे.
आशिष नेहरा आणि रूश्मा दोघांनी सात वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी २३ मार्च २००९ रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रूश्मा ही गुजरात मधील राहणारी होती. आशिष नेहराने १५ मिनिटांत लग्नाचा प्लॅनंही बनवला होता. आशिष नेहराने एका इंटरव्यूमध्ये बोलताना याबाबत खुलासा केला आहे.
आशिष नेहरा आणि रूश्मा यांनी २ एप्रिल २००९ रोजी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी दोन वर्षानंतर भारतीय संघाने २०११ चा विश्वचषक जिंकला होता. आशिष आणि रुश्मा यांना आरुष नेहरा आणि आरियाना नेहरा ही दोन मुलं आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
‘तो खेळ बदलू शकेल एवढा मोठा खेळाडू नाही’, विश्वविजेत्या क्रिकेटरने रियान परागला फटकारले
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहील्यानगर करून स्वाभिमानी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करा; पडळकरांचे आव्हान
मुंग्यांनी केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळेच देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली, खाणीत आहे २२ कोटी टन सोने