Share

love affair : बायकोला प्रियकरासोबत रंगेहात पकडायला गेला अन् स्वतःच अडकला; कोर्टाने ठोठावलाय ४५ हजारचा दंड, वाचा हे प्रकरण आहे काय?

love affair

love affair : चारित्र्य संशयावरून अनेकांचे संसार उध्वस्त होतात. नवऱ्याचे बाहेर कोणाशी तरी अफेअर, त्याचप्रमाणे बायकोचे दुसऱ्या कोणाशी अफेअर, यामुळे त्या दोघांमध्ये वाद होतात. आणि अनेक विचित्र घटना घडतात. अशी प्रकरणे आपण पाहिली असतील. मात्र बायकोची चोरी पकडायला गेलेल्या नवऱ्याला न्यायालयाने दंड ठोठावल्याची अजब घटना समोर येत आहे.

एका विवाहित जोडप्यामधील नवऱ्याला त्याच्या बायकोवर संशय होता की, तिचे बाहेर परपुरुषाशी संबंध आहेत. मात्र हा संशय बोलून दाखवणार कसा? म्हणून त्याने बायकोवर पळत ठेवण्याचे ठरवले. त्यानुसार एके दिवशी रात्रीच्या वेळी त्याची बायको बाहेर पडली. तेव्हा त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

बायको घराबाहेर पडल्यावर इतर कोणत्या ठिकाणी नाही तर, शेजाऱ्याच्या घरामध्ये गेल्याचे त्याने पाहिले. ते पाहताच त्याला धक्का बसला. मात्र तिच्या मागेमागे जात त्याने शेजाऱ्याच्या दारापाशी काही वेळ वाट पाहिली. त्यानंतर दरवाजा वाजवून तो आतमध्ये गेला.

माझी बायको कुठे आहे? अशी विचारणा त्याने शेजाऱ्याला केली. त्यावर ती आपल्या घरात नसल्याचे शेजाऱ्याने सांगितले. मात्र स्वतःच्या डोळ्याने आपल्या बायकोला शेजाऱ्याच्या घरात शिरताना पाहिल्याने त्या व्यक्तीने घरातच शोधाशोध करण्यास सुरुवात केली.

शेजाऱ्याच्या बेडखाली लपून बसलेल्या आपल्या पत्नीला पाहताच त्याच्या संतापाचा पारा चढला. त्याने आपल्या बायकोला नाकावर बुक्क्या मारण्यास सुरुवात केली. मध्ये पडलेल्या शेजाऱ्याला ही मारहाण करायला सुरुवात केली. बायकोला मारहाण करताना तिच्या नाकातून रक्त येत होते.

या घटनेनंतर त्याच्या बायकोने न्यायालयात त्याच्याविरुद्ध केस दाखल करत संबंध संपवले. न्यायालयाने या केसबाबत त्या बाईच्या नवऱ्याला ४५ हजाराचा दंड ठोठावला. आणि एक वर्ष तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ब्रिटनमध्ये घडली असल्याचे समोर येते.

महत्वाच्या बातम्या-
politics : राष्ट्रवादीत लवकरच राजकीय भुकंप; अजितदादांची गृहमंत्रीपदाची आकांक्षा भाजप पुर्ण करणार? बावनकुळेंचे संकेत
Shinde group : गुवाहाटीहून सेनेत परतलेल्या आमदारानेच ठाकरेंना खाली खेचण्याची shinde group : घातली होती गळ; संदीपान भुमरेंचा गौप्यस्फोट
student : दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच अचानक मृत्यू; वाचा सरकारी शाळेत नेमकं घडलं काय?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now