Share

IAS अधिकारी आहे की फिल्मचा हिरो; पर्सनॅलिटी पाहून 4 हजार तरुणींनी घातली लग्नासाठी मागणी, पाहा फोटो

अनेक लोक मोठ्या सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. त्यात अभिनय क्षेत्रातील सेलिब्रिटी असतील तर लोक वेडे होतात. सोशल मीडियावर चाहते अशा सेलिब्रिटींना प्रपोज देखील करतात. मात्र, आता एक असा IAS अधिकारी चर्चेत येत आहे, ज्याचा फॅन फॉलोअर्स वाढला असून, तब्बल 4 हजार मुलींनी त्याला लग्नासाठी मागणी घातली आहे.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक तरुण तरुणींचा आदर्श मोठ मोठे सरकारी अधिकारी असतात. कोणी सरकारी अधिकाऱ्याची हुशारी पाहून , तर कोणी काम करण्याची पद्धत, तर कोणी त्याची पर्सनालिटी पाहून संबंधित अधिकाऱ्याला फॉलो करत असतात.

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारा IAS अधिकारी त्याच्या पर्सनालिटीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या अधिकाऱ्याचे एखाद्या अभिनय क्षेत्रातील सेलिब्रिटीसारखे फॅन फॉलोअर्स आहेत. अनेक तरुणी या सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेमात वेड्या झाल्या आहेत. या अधिकाऱ्याला एकाच दिवशी तब्बल चार हजार मुलींनी लग्नासाठी मागणी केली आहे.

या IAS अधिकाऱ्यांचे नाव अहतर आमिर खान असं आहे. त्यांनी UPSC परिक्षेत ऑल इंडिया द्वितीय क्रमांक पटकावला होता. सध्या त्यांची पोस्टिंग श्रीनगर इथे झाली आहे. हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब अशा प्लॅटफॉर्म्सवर शेअर करतात.

यावेळी देखील त्यांनी असाच एक फोटो शेअर केला होता. ज्याला प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अहतर आमिर खान यांनी 12 एप्रिल रोजी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर तासाभरात 20 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

लक्षवेधी बाब म्हणजे कमेंट करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुली किंवा महिला आहेत. तब्बल 4 हजारांपेक्षा अधिक कमेंटमध्ये तर अहतर आमिर खान यांना लग्नाचीच मागणी घालण्यात आली आहे. त्यांच्या फॉलोअर्समध्ये तरुणींची संख्या अधिक आहे.

त्यांच्या प्रत्येक पोस्टवर तरुणी आपलं प्रेम व्यक्त करतात. अनेकांसाठी तर ते स्वप्नातील राजकुमारासारखेच आहेत. त्यांचे UPSC परिक्षेसंबंधीत मोटिव्हेशनल व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना भारतातील सर्वात हँडसम सरकारी अधिकारी असं देखील म्हटलं जातं

इतर

Join WhatsApp

Join Now