गेल्या 14 वर्षांपासून शाळेचा मालक आणि मुख्याध्यापक विद्यार्थिनींवर लैगिंक छळ करत होते. विशेष म्हणजे गावातील लोकांना याची माहिती असून देखील त्यांनी या विरोधात बोलण्याची कधी हिम्मत केली नाही. तब्बल 14 वर्षांपासून शाळेचा मालक आणि मुख्याध्यापक यांचा हा घाणेरडा प्रकार चालू होता. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना पंजाब मधील एका शाळेतून समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाचा आणि मालकाचा गेले 14 वर्ष शाळेतील विद्यार्थिनींवर लैगिंक छळ सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे पीडित आणि गावकरी यांना याबाबत माहिती असून देखील लज्जेखातर आणि मुख्याध्यापकावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे त्यांनी हे प्रकरण लपवून ठेवलं.
ही शाळा पंजाब राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असून शाळेला सरकारी निधी मिळतो. आता मुख्याध्यापक आणि मालकाचे हे अश्लील चाळे समोर आले असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शाळेतील विद्यार्थिनींवर लैगिंक छळ करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाचे वय 54 वर्ष आहे.
15 फेब्रुवारीला शाळेतील तीन विद्यार्थिनींचे 198 फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मुख्याध्यापकाने हे फोटो आपल्या संगणकावरून काढल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने एसआयटी स्थापन केली आहे.
या प्रकरणाबाबत आता एक माजी विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी समोर आला आहे. मुख्याध्यापकाने अटक झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार राणा के पी सिंग यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा केला होता. याबाबत चौकशी केली असता, आमदारांनी त्यांचे मुख्याध्यापकाशी काहीही संबंध नसल्याचं बोललं आहे.
पंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापकाच्या या अश्लील गोष्टीबाबत आम्हाला माहिती होते. परंतु या विरोधात कोणताही ठोस पुरावा आमच्याकडे नव्हता. कोणत्याही विद्यार्थिनींनी यावर तक्रार केली नाही. गावकरी आणि पीडित विद्यार्थिनींनी लाजेखातर आणि त्यांच्यावर असलेल्या राजकीय दबावाच्या भीतीपोटी हे प्रकरण लपवून ठेवलं होतं.