साधारणपणे आजपर्यंत आपण साप हा सर्वात विषारी प्राणी आहे असे ऐकत आलो आहे. सापाच्या काही प्रजाती सोडल्या तर बहुतेक सापांच्या प्रजाती अत्यंत विषारी असतात. जर त्याने एखाद्याला चावले तर त्यातून जीव वाचवणे काही परिस्थितीत शक्य नसते. मात्र, आता सापापेक्षा अधिक विषारी असणारा एक कीडा आढळला आहे.
सापाने या विषारी किडयाला खाल्ल्याने सापाचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. फ्लोरिडामध्ये एका सापाची अशी प्रजाती आहे, जो अतिशय लाजाळू आहे. सहसा हा साप सगळ्यांपासून लपवून शिकार करतो. या लाजाऊ प्रजातींच्या सापाला सर्वांसमोर खुल्या वातावरणात आपलं भोजन करणं आवडत नाही. याचे नाव रिम रॉक आहे.
दरम्यान, या प्रजातीच्या सापाचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित विषारी किडयाबद्दल माहिती समोर आली. या लाजाळू प्रजातींच्या सापांचा मृत्यू होत असल्याने, वन्यजीव अधिकाऱ्यांची चिंता वाढली. मृत सापाने तोंडाने खाल्लेल्या शिकारमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्याचे काही पुरावे देखील समोर आले आहेत.
संशोधनातून असे समोर आले की, या प्रजातींच्या सापाने एका विषारी किडयाला आपलं भोजन बनवण्याचा प्रयत्न केला होता. तो त्याच्यापेक्षाही खतरनाक आणि जीवघेणा होता. फ्लोरिडा मत्स्य आणि वन्यजीव संरक्षण आयोगाच्या ही गोष्ट एका व्हिजिटरमुळे निदर्शनास आली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या फ्लोरिडामदील जॉन पेनीकँप कोरल रीफ स्टेट पार्कमध्ये फिरत असताना एका व्हिजिटरची नजर तोंडात किडा पकडलेल्या मृत सापावर पडली. त्यानंतर शोध घेतला गेला. वन्यजीव अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रिम रॉक या सापाची प्रजाती अतिशय दुर्मिळ आहे.
2015 नंतर ही प्रजाती कुठेही दिसली नाही. तपासात समजलं की या दुर्लभ सापाच्या मृत्यूचं कारण एक विषारी किडा आहे एफडब्ल्यूसीने म्हटलं की, या सापामध्ये सहसा सेंटीपीड किड्याच्या विषासोबत लढण्याची क्षमता असते. मात्र कदाचित यावेळी दोघांचा आमना- सामना झाला तेव्हा हे सगळंच बदललं. याची अधिक माहिती संशोधक घेत आहेत.