Share

राज्यातील शाळांबाबत सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय, १ मार्चपासून..

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. यामुळे सरकार १ मार्चपासून पुर्ण वेळ शाळा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहता शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत.

त्यांच्या या मागणीचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करुन राज्य सरकार पुढील १ मार्च पासुन पुर्ण वेळ शाळा सुरू करणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. यासाठी प्रशासनाने चाचपणी सुरू करुन शाळांसोबत आढावा बैठक घेण्यास सुरूवात केली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मध्यंतरी राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती बघता सरकारने कठोर निर्बंध लागु केले होते. परंतु या लाटेचा धोका जास्त नसल्यामुळे सरकारने पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच हॉटेल, सिनेमागृह, मंदिरे उघडण्यास देखील सरकारने परवानगी दिली. मात्र शाळा उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली नाही.

दरम्यान सध्याच्या घडीला कोरोना विषाणूचे सावट दुर झाल्यामुळे सरकार लवकरच पुर्णवेळ शाळा सुरु करणार आहे. याबाबत सरकारने पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकार शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण अधिकारी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून अभिप्राय मागवत आहे. सर्व गोष्टी तपासुन लवकरच पुर्णवेळ शाळा सुरु होणार आहेत.

यापुर्वी पुर्णवेळ शाळा सुरु करण्यासाठी पालकांनी सरकारकडे निवेदन पत्र पाठविले होते. त्यावेळी या मागणीवर सरकार विचार करुन कळवेल असे सांगण्यात आले होते. सुरुवातीला कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली बघता विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाउले उचलण्यास सुरुवात केली होती.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत पण अभ्यासक्रम भरुन काढण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. यावरुन आता शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे. असे आव्हाहन अजित पवार यांनी शिक्षकांना केले होते.

महत्वाच्या बातम्या
फरहान आणि शिबानीने मराठी किंवा ख्रिश्चन पद्धतीने लग्न का नाही केले? वाचा यामागचे मुख्य कारण
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक सेक्स रॅकेट उघड, एका रात्रीत २० हजार कमावणाऱ्या ‘त्या’ मुली कोण?
लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली; डझनभर आजारांसोबत किडनी फक्त 20 टक्के कार्यरत…
ऋतिक रोशन पुन्हा दिसला त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत, व्हायरल फोटोनंतर अफेअरच्या चर्चांना उधाण

राज्य शिक्षण

Join WhatsApp

Join Now