एका मुलीने तिची भावनिक प्रेमकहाणी शेअर केली आहे. तिने सांगितले की, तिच्या मृत्यूनंतरही तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले. मुलीचा प्रियकर कॉमन व्हेरिएबल इम्युनोडेफिशियन्सी (CVID) या आजाराने ग्रस्त होता, त्यामुळे त्याच्या फुफ्फुसांना इजा झाली होती. वृत्तानुसार, क्लिओधना कॉसग्रोव्ह असे या मुलीचे नाव आहे. ती आणि मार्क आमोस रिलेशनशिपमध्ये होते. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, काही महिन्यांनंतर कॉसग्रोव्हला कळले की मार्क सीव्हीआयडीने ग्रस्त आहे.(Love Story, Common Variable Immunodeficiency, Cleodhana Cosgrove, Mark Amos)
दोघे २०१८ मध्ये भेटले होते. कॉसग्रोव्हच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिच्या आयाचा मृत्यू झाला तेव्हा मार्क तीन दिवस तिच्यासोबत राहिला आणि तिथूनच त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. कॉसग्रोव्ह म्हणते की २०१९ मध्ये माझ्या २७व्या वाढदिवसाला मार्कने गुडघ्यावर बसून मला मागणी घातली होती, त्यानंतर त्याने मला अंगठी घातली होती.
कॉसग्रोव्हने सांगितले की, आम्ही दोघांनीही अनेकदा तीन मुले होऊन देण्याचा विचार केला होता, पण मार्कला होणाऱ्या समस्यांमुळे त्याला आपल्या प्रजनन क्षमतेचीही काळजी वाटत होती. पण, या जोडप्याने हिंमत हारली नाही आणि पालक बनण्याचा प्रयत्न सुरू केला. ते दोघेही यशस्वी झाले. काही काळानंतर, कॉसग्रोव्हचा गर्भधारणा अहवाल सकारात्मक आला.
१८ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांची मुलगी डार्सीचा जन्म झाला. पण, त्याच महिन्यात मार्कला छातीत जंतुसंसर्ग झाला, ज्यामुळे नंतर त्याला न्यूमोनिया झाला. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा असे आढळून आले की त्याला ग्रॅन्युलोमॅटस लिम्फोसाइटिक इंटरस्टिशियल लंग डिसीज (GLILDE) नावाचा दुर्मिळ फुफ्फुसाचा विकार झाला आहे.
कॉसग्रोव्हच्या म्हणण्यानुसार, मार्ककडे आता जास्त वेळ नाही हे लक्षात आले होते. ६ जून रोजी, जेव्हा त्याच्या मुलीचे नाव ठेवले जात होते, तेव्हा मार्कने फॅमिली फोटोसाठी एका बाजूला श्वासोच्छवासाची नळी काढून ठेवली. पुढच्याच आठवड्यात मार्कला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
१० दिवसांनंतर असे दिसून आले की मार्कचे फुफ्फुस खराब झाले आहे आणि हृदयाभोवती द्रव जमा झाला आहे. त्यानंतर मार्कला पॅलिएटिव्ह केअरमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरही फार काही करू शकले नाहीत. ती म्हणाली, मार्कसाठी मला नेहमीच स्ट्राँग व्हायचे होते.
२० सप्टेंबर २०२१ रोजी मार्कचा २६ वा वाढदिवस होता. यादरम्यान मार्कचा अंत जवळ आल्याची भीती कुटुंबीयांना होती. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाटेत तो त्याचे आवडते गाणे ‘Ev’ry Time I Say Goodbye by Ella Fitzgerald’ म्हणत होता. तीन तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.
कॉसग्रोव्हने सांगितले की त्याला टॅटू काढायचा होता, ज्याला अंत्यसंस्कार संचालकांनी परवानगी दिली. कॉसग्रोव्हने असेही सांगितले की आम्हाला लग्न करण्याची संधी मिळाली नाही, म्हणून त्यांनी पादरीला त्याचा आशीर्वाद समारंभ करण्यास सांगितले. यानंतर तिने मार्कला अंगठी घातली आणि स्वतःही त्याच्याकडून अंगठी घालून घेतली. यानंतर ती आयुष्यभर मार्कवर प्रेम करत राहील असे वचनही तिने दिले. तीन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कॉसग्रोव्हच्या म्हणण्यानुसार, तिने अभिमानाने त्याला लग्नाची अंगठी घातली आहे आणि तिच्या नावात मार्कचे आडनाव जोडण्याची तयारी करत आहे. कॅसग्रोव्हने सांगितले की जरी तो सोडून गेला असेल, परंतु तरीही ती स्वत: ला मार्कची पत्नी मानते. कॉसग्रोव्हने सांगितले की, गेल्या काही दिवसांत मार्कने त्याच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ बनवले होते, जे ती आपल्या मुलीला दाखवते.
महत्वाच्या बातम्या-
विजयानंतर महाडीकांचा मुलगा वडीलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला; बापलेकाचं प्रेम पाहून सर्वच भावूक
दलित मुलाच्या प्रेमात पडल्याने बापाने मुलीला संपवलं, मुलीला तडफडताना पाहून आईने केलं हे कृत्य
३ मुलांचा बाप असलेल्या प्रभुदेवाच्या प्रेमात वेडील होती ही अभिनेत्री, त्याच्या पत्नीला दिले होते कोट्यावधींचे गिफ्ट
प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ बोल्ड, प्राची सिंहसोबत झालं ब्रेकअप, वाचा कोण आहे प्राची सिंह?