बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून एक वेगळाच प्रकार घडला आहे. याठिकाणी प्रेम दाखवण्याची वेळ येताच प्रेयसीने पळ काढला आहे. विष पिल्यामुळे तडफडत असलेल्या प्रियकराला तिथेच सोडण्याचे कृत्य या प्रेयसीने केले आहे. एकेकाळी या दोघांनी सोबत जगण्या मरण्याची वचने घेतली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंगेर जिल्ह्यातल्या मुस्तफाचक गावचा सोनू कुमार गेल्या एक वर्षांपासून विवाहित महिलेसोबत नातेसंबंधात होता. मध्यंतरी महिलेच्या पतीला या दोघांच्या नात्याबदल समजले. त्यामुळे संबंधीत महिला सासर सोडून अभयपूरला म्हणजेच आपल्या माहेरी आली. त्यामुळे एकेदिवशी महिलेने तरुणाला भेटण्यासाठी बोलविले.
यावेळी महिलेच्या कुटुंबीयांनी तिला सोनूसोबत जाऊन दिले नाही. तसेच या दोघांच्या नात्याला त्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे दोघांनी विष पिऊनसोबत मरण्याचा निर्णय घेतला. हे दोघे विष घेऊन गावाबाहेर देखील गेले. मात्र तिथे गेल्यानंतर फक्त सोनूनेच विष पिले.
शेवटच्या क्षणाला महिलेने विष पिण्यास नकार दिला. महिलेने भितीपोटी सोनूला अशा गंभीर अवस्थेत तेथेच सोडत पळ काढला. यानंतर काही गावकऱ्यांनी सोनूला पाहिले. त्यांनी त्वरीत त्याला रुग्णालयात दाखल केले.
सध्या सोनूवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुध्दीत आल्यानंतर सोनूने सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे. तसेच प्रियसीने शेवटच्या क्षणाला धोका दिल्याचा धक्का सोनूला चांगलाच बसला आहे. सोनू लुधियानामध्ये नोकरी करतो. आपल्या प्रियसीसाठी सर्वकाही करण्याची त्याची तयारी होती.
प्रियसीला भेटण्यासाठी जाताना त्याने लग्न करुन नवीन आयुष्याला सुरुवात करण्याचा विचार केला होता. आता या घटनेमुळे सोनूला प्रेम केल्याचा पश्चात्ताप होऊ लागला आहे. इकडे पोलिसांनी महिलेविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर सोनूचा जबाब नोंदवून घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचे आकस्मिक निधन, क्रिडाजगतावर पसरली शोककळा
येडा का खुळा! प्रेयसीला बर्थडे विश करण्यासाठी जेलमधून पळाला, असा आखला होता प्लॅन
भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान, म्हणाला, हलाल मांस म्हणजे आर्थिक जिहाद; हिंदूंना केले ‘हे’ आवाहन
इस्त्राईलमध्ये दहशतवाद्याने कसाबसारखा केला अंदाधुंद गोळीबार, ५ लोकांचा मृत्यु,