फॉक्सकॉन(Foxconn): वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राकडे येणार होती. पण गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड झाली असल्याचे वेदांत ग्रुपने जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत ग्रुपने महाराष्ट्राशी या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु केली होती.
सत्तांतरानंतर जुलै महिन्यात वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या मंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारवर अनेकांकडून टीका केली जात आहे. हा प्रकल्प तळेगाव येथे होणार होता. पण शिंदे फडणवीस सरकार येऊन काही दिवसच झाले आणि लगेच प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत अनेक प्रश्न उद्भवले आहे.
अशातच वेदांत ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी प्रकल्पासाठी गुजरातची निवड का केली याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण प्रकल्प गुजरातला देण्याचा सल्ला कोणाचा होता हे उघड केले नाही. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने तो प्रकल्प महाराष्ट्रात येणे महत्वाचे होते.
प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड का केली? असे अनिल अग्रवालांना विचारले असता ते म्हणाले की, हा तंत्रज्ञान विषयक व्यासायिक प्रकल्प होता. त्यामुळे फॉक्सकॉनच्या व्यवस्थापन सल्लागार फर्मसोबत तज्ञ लोकांची एक समिती नेमली होती. त्या समितीने पाच ते सहा राज्यांना भेट देऊन त्याची पाहणी केली. सर्व राज्याने आम्हाला सोयीसुविधा देऊ केल्या आणि आवश्यक सर्व गोष्टी ऑफर केल्या.
आमच्याकडे वेळ कमी असल्याने निर्णय लवकरात लवकर घेण्यात आला. समितीला आणखी दोन महिने द्यायला आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आम्ही म्हणालो तुम्ही शिफारस करा. तुम्ही जे ठरवाल, त्यावरच ठाम राहून आपण पुढील काम करू.. आणि त्यांनी गुजरातला जाण्याची शिफारस केली. सल्लागार कोण होते? असे विचारले असता अनिल अग्रवाल म्हणाले मला त्यांचे नाव घ्यायचे नाही.
प्रकल्प उभारणीसाठी निधी देण्याची तुमची योजना कशी आहे? असे विचारले असता ते म्हणाले की, जगात एकही अशी संस्था नाही जे या प्रकल्पाला निधी देऊ इच्छित नाही. हा निधी दोन टप्प्यात केला जाईल, एक टप्पा जवळपास $ १० अब्ज राहील. या प्रकल्पासाठी निधीची काहीच कमतरता राहणार नाही. या प्रकल्पाची सर्वत्र आतुरतेने वाट पाहली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
sanjay raut : वेदांता महाराष्ट्राच्या हातून निसटला अन् राऊतांच्या शेवटच्या ‘त्या’ विधानाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली
shinde government : बारामतीतील ‘हा’ मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार; शिंदे सरकारचा थेट शरद पवारांना ‘दे धक्का’
Shivsena : शिंदेंनी शिवसेना फोडली, आता शिवसेनेने काॅंग्रेसला पाडले खिंडार; बड्या नेत्याचा सेनेत प्रवेश
Salman khan : सलमानला मारण्यासाठी बनवला होता प्लॅन-बी, फार्म हाऊसच्या मार्गावर भाड्याने घेतली होती रूम, पण…